मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Goa highway Accident : मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात; कार व ट्रकच्या धडकेत ९ ठार

Mumbai Goa highway Accident : मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात; कार व ट्रकच्या धडकेत ९ ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 19, 2023 02:14 PM IST

Accident near Raigad on Mumbai Goa highway : मुंबई-गोवा मार्गावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल ९ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

Accident on Mumbai-Goa highway
Accident on Mumbai-Goa highway

raigad accident news today : मुंबई - गोवा महामार्गावर रायगडजवळील रेपोली गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल ९ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात आज पहाटे ५ च्या सुमारास घडला. या आपघातामुळे मुंबई गोवा मार्गावरची वाहतूक ही ठप्प झाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरुळीत केली. दरम्यान, ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. समोरासमोर टक्कर झाल्याने कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.  मृतांमध्ये हेदवी, डावखोत, सावंतवाडी येथील लोकांचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमध्ये शोककळा पसरली आहे.  

  अमोल रामचंद्र जाधव (वय ४०, रा. हेदवी), दिनेश रघुनाथ जाधव (वय ३६, रा. हेदवी),  कांचन काशिनाथ शिर्के (वय ५० ), नंदिनी निलेश पंडित (वय ३५, रा. डावखोत), निलेश पंडित (वय ४२, डावखोत), अनिता संतोष सावंत (वय ५५, रा. सावंतवाडी),  मुद्रा निलेश पंडित (वय १२, डावखोत), लाड मामा (वय ५८, रा. डावखोत), निशांत शशिकांत जाधव (वय २३) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर  भव्य निलेश पंडित हा जखमी झाला आहे. 

रायगडचे पोलिस अधीक्षण सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या महितीनुसार, अपघातग्रस्त कारमधून मुंबईतील जाधव कुटुंबीय प्रवास करत होते. हे सर्वजण मालाड आणि बोरिवली परिसरात वास्तव्याला होते. नातेवाईकाच्या वर्षश्राद्धासाठी हे सर्वजण गावी निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा अपघात झाला.  पहाटे पावणे पाचच्या सुमारास मुंबई गोवा हायवेवर माणगाव नजीक गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेपोली गावाजवळ ट्रकने त्यांच्या  इको कारला समोरासमोर धडक दिल्याने गाडीतील  नऊ जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. त्याला माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

चिपळूण जवळील लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-43 /U/ 7119 व मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या इको गाडी न MH- 48 BT8673 यांच्यामध्ये हा अपघात झाला आहे. इको व्हॅन मध्ये एकूण दहा जण होते. टक्कर इतकी जोरात होती की गाडीचा चेंदामेंदा झाला असून गाडीमधील नऊ जण जागीच ठार झाले.  जाधव  कुटुंबातील चार वर्षांचा चिमुरडा मात्र या भीषण अपघातामधून सुदैवाने बचावला आहे.

IPL_Entry_Point

विभाग