मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur news : हेडफोन लावणे बेतले जीवावर! नागपुरात रेल्वे रुळ ओलांडताना विद्यार्थिनी चिरडून ठार

Nagpur news : हेडफोन लावणे बेतले जीवावर! नागपुरात रेल्वे रुळ ओलांडताना विद्यार्थिनी चिरडून ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 19, 2023 01:58 PM IST

Nagpur News : नागपुरात हेडफोन लाऊन रेल्वे रूळ ओलांडणे एका मुलीला चांगलेच महागात पडले आहे. या मुलीला रेल्वेने धडक दिल्याने तिचा रेल्वे खाली चिरडून मृत्यू झाला आहे.

 Nagpur news
Nagpur news (MINT_PRINT)

नागपूर : नागपुरात एका मुलीला हेड फोन लावून बोलणे जिवावर बेतले आहे. ही मुलगी रेल्वे रूळ ओलंडत होती. यावेळी दुसऱ्या बाजूने रेल्वे येत होती. ही बाब नागरिकांना दिसताच त्यांनी तरुणीला सांगळण्याचा प्रयत्न केला मात्र, तिला ऐकू न गेल्याने भरधाव रेल्वे खाली चिरडून तीचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर येथील डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ बुधवारी सकाळी घडली.

मकरसंक्रांती दिवशी पित्याने दोन मुलांना तिळगूळ ऐवजी दिले विष, स्वत:ही घेतला गळफास; नागपुरातील घटना

आरती मदन गुरव (वय १९) असे रेल्वे खाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आरती ही बुधवारी सकाळी टाकळघाटवरुन गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटीने आली. यानंतर रेल्वे फाटकाच्या मार्गाने ती पुढे चालत रेल्वे स्थानकाकडे जात होती. यावेळी ती हेडफोन लावून मोबाइल वर बोलत होती. दरम्यान, ती रेल्वे रूळ ओलंडत होती. यावेळी एक भरधाव रेल्वे येत होती.

ही बाब काही नागरिकांना दिसली. त्यांनी आरतीला ओरडून आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हेडफोन मुळे तिला आवाज गेला नाही. दरम्यान, क्षणात भरधाव रेल्वेने तिला उडवले. यात ती रेल्वे खाली आल्याने तीचा चिरडून दुर्दैवी अंत झाला. पुणे-नागपूर रेल्वेने तिला तब्बल ५० फुटांपर्यंत फरफटत नेले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पथकासह दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आरती भंडारा जिल्ह्यातील सातोना येथील मुळ रहिवाशी असून ती नागपूर येथे शिक्षण घेत होती. या साठी ती हिंगणा तालुक्यातील टाकळघाट इथे मावशीकडे राहत होती. ती डोंगरगावजवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. मात्र, या घटनेत तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

IPL_Entry_Point

विभाग