मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Black Magic : पुत्रप्राप्ती आणि भरभराटीसाठी सुनेला खाऊ घातला मानवी हाडांचा चुरा; पुण्यात खळबळ

Pune Black Magic : पुत्रप्राप्ती आणि भरभराटीसाठी सुनेला खाऊ घातला मानवी हाडांचा चुरा; पुण्यात खळबळ

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 19, 2023 03:00 PM IST

Pune Black Magic : पुण्यात घरी भरभराट यावी आणि पुत्र प्राप्ती व्हावी या साठी सुनेवर घरच्यांनी अघोरी पूजा केल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Black Magic
Pune Black Magic

पुणे : 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात सुबत्ता यावी आणि पुत्र प्राप्त व्हावी या साठी घरच्यांनी एका महिलेवर अघोरी पूजा केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी घरातील तब्बल ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड रोजवरील धायरी परिसरात हा प्रकार घडला आहे. या  विवाहितेला मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबडीची अघोरी पूजा करून ही राख पाण्यातून जबरदस्तीने पाजून ही अघोरी पूजा करण्यात आली आहे. 

जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पोकळे कुटुंबीय हे घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी आणि मूल बाळ व्हावं यासाठी घरातील सुनेवर पती, सासू सासऱ्यांनी अघोरी पूजा केली. पोकळे कुटुंबीय हे सुनेला मानसिक त्रास देखील द्यायचे. या सोबतच तिला शिवीगाळ आणि मारहाण देखील करायचे. तब्बल २०१९ पासून हा प्रकार सुरू होता. लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा सुनेकडे पैशांची मागणी केली होती. याबरोबरच सासरचे लोक महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी अनेक वेळा मागणी करुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचे.

 

दरम्यान, दरम्यान, काही दिवसांपूर्वी घरच्यांनी पुत्र प्राप्तीसाठी महिलेवर अघोरी पूजा केली. अखेर हा त्रास सहन न झाल्याने पीडित महिलेने सिंहगढ पोलिस ठाण्यात धाव घेत घरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार सासरच्या कुटुंबातील तब्बल ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरी असलेल्या सगळ्या जणांनी मिळून अघोरी आणि जादूटोणा करुन पूजा केल्या प्रकरणी पोलिसांनी नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम ३ अंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग