मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दाऊदशी कनेक्शन.. पाकिस्तानात गुटखा फॅक्टरी; कोण आहेत जे.एम जोशी? कोर्टाने सुनावली १० वर्षाची शिक्षा

दाऊदशी कनेक्शन.. पाकिस्तानात गुटखा फॅक्टरी; कोण आहेत जे.एम जोशी? कोर्टाने सुनावली १० वर्षाची शिक्षा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 09, 2023 11:33 PM IST

guthka king jm joshi : पाकिस्तानमध्ये दाऊदला गुटखा कारखाना सुरू करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी मुंबईतील विशेष कोर्टाने गुटखा किंग जे. एम. जोशीला १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तान गुटखा फॅक्टरी
पाकिस्तान गुटखा फॅक्टरी

गोवा गुटखा व्यापारी जे. एम. जोशी याला मुंबई विशेष न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेबरोबरच जोशीला पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला गुटखा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केल्याचा जोशीवरआरोप ठेवण्यात आला आहे. दाऊदच्या मदतीनेच त्याने २००२ मध्ये पाकिस्तानमध्ये गुटख्याची फॅक्टरी सुरू केली होती. याच प्रकरणात मुंबई विशेष न्यायालयानेत्यांना दोषी ठरवले होते. जोशीबरोबरच जमीरुद्दीन अंसारी आणि फारुख अंसारी यांना देखील आरोपी म्हणून जाहीर करत शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याप्रकरणी माणिकचंद गुटखाचे मालक रासिकलाल धारिवाल हे देखील आरोपी होते, परंतु धारीवाल यांचं खटल्या दरम्यानच निधन झाल्यानं त्यांच्यावरील खटला थांबवण्यात आला होता. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या तिघांना १० वर्षांची शिक्षा आणि ५ लाखांचा दंडही ठोठावला आहे.

आज न्यायालयात युक्तीवाद करताना जोशी यांचे वकील सुदीप पासबोला यांनी म्हटले की, देशातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून सरकारला कोट्यवधींचा महसूलही मिळवून दिला आहे. या गुन्ह्याखेरीज त्यांच्यावर अन्य गुन्ह्याची नोंद नाही. त्यामुळे त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती त्यांनी दिली. मात्र सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले की, जोशींच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी त्यावेळी पोलिसांकडे जाणे योग्य होते. यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना समान शिक्षा सुनावली.

२००२ मध्ये दाऊदने पाकिस्तानात गुटखा उत्पादन सुरू करण्यासाठी जोशी व धारिवाल यांच्याकडे मदत मागितली होती. दाऊदच्या उत्पादनाचे नाव'फायर गुटखा' असं होणार होतं. त्यावेळी जोशींनी जवळपास अडीच कोटी रुपयांची पाच मशिन्स दुबईमार्गे पाकिस्तानला पाठवली होती. मात्र त्यानंतर जोशी यांनी धारिवाल यांच्यापासून दूर होत गोवा गुटखा सुरू केला होता. अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी न्यायालयाला दिली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग