मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : दुर्दैवी ! बाराव्या मजल्यावरून पडल्याने पिता-पुत्राचा मृत्यू; आत्महतेचा संशय

Pune : दुर्दैवी ! बाराव्या मजल्यावरून पडल्याने पिता-पुत्राचा मृत्यू; आत्महतेचा संशय

Jan 28, 2023, 06:49 AM IST

    • Pune News : वाकड येथील एका सोसायटीच्या १२ व्या मजल्यावरून पडून पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.
Death (Representative Image)

Pune News : वाकड येथील एका सोसायटीच्या १२ व्या मजल्यावरून पडून पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.

    • Pune News : वाकड येथील एका सोसायटीच्या १२ व्या मजल्यावरून पडून पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.

पुणे : तब्बल बाराव्या मजल्यावरून पडल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील वाकड परिसरातील ग्रीन पलाश हाऊसिंग सोसायटीत शुक्रवारी सकाळी घडली. आधी मुलाला ढकलुन त्यानंतर वडिलांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी नोंदवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

आदेश क्रांती तावडे (वय १६), क्रांती तावडे (वय ४४) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन पलाश हाऊसिंग सोसायटी येथे दोघेजण इमारतीवरून खाली पडल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली.

पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. यावेळी त्यांना दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मुलगा आदेश याला बाराव्या मजल्यावरून ढकलून देऊन त्यानंतर क्रांती यांनी उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. क्रांती यांचा पत्नी, मुलगी, आई, वडील असा परिवार मागे आहे. क्रांती आणि आदेश मनोरुग्ण असल्याचे देखील म्हटले जाते. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा