मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : मुकेश अंबानींनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; चर्चेत काय ठरलं?

Eknath Shinde : मुकेश अंबानींनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; चर्चेत काय ठरलं?

Sep 25, 2022, 09:52 AM IST

    • Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.
Mukesh Ambani Meet Eknath Shinde In Mumbai (HT)

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.

    • Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.

Mukesh Ambani Meet Eknath Shinde In Mumbai : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सुपुत्र अनंत अंबानीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. काल मध्यरात्री अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधान आलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी थेट त्यांच्या बंगल्यावर पोहचल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या भेटीचा तपशील अजून बाहेर आलेला नाही. परंतु वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची अंबानींशी झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध उद्योजक आणि जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता अंबानींनी शिंदेंची भेट घेतल्यानं त्याला महत्त्व आलं आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर रिलायन्सच्या आगामी प्रकल्पांना सहकार्य करण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. याशिवाय वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीबाबत अंबानी यांच्याशी चर्चा केल्याचं समजतं. त्यामुळं आता अंबानी आणि शिंदे यांच्या भेटीची राजकीय चर्चा रंगली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगावात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रकल्प अचानक गुजरातमध्ये हलवण्यात आला होता. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेदांता प्रकल्प हातातून गेल्यानंतर नवीन प्रकल्प मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.