मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shinde Govt : आरेला कारे करा, कुणी एक मारली तर तुम्ही चार मारा- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Shinde Govt : आरेला कारे करा, कुणी एक मारली तर तुम्ही चार मारा- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 25, 2022 08:41 AM IST

Shinde Fadnavis Govt : काल परभणी दौऱ्यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा शिवसैनिकांनी रोखला होता. त्यानंतर आता त्यांनी जशास तसं उत्तर देण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.

Abdul Sattar
Abdul Sattar (HT)

Shinde Fadnavis Govt : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांचा ताफा काल परभणीत शिवसैनिकांनी अडवून धरला होता. त्यानंतर आता संतापलेल्या सत्तारांनी ठाकरेंवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना सत्तारांनी शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं आता शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, तुम्हाला कुणी आरे करत असेल तर त्याला कारे करा, कुणी तुम्हाला एक मारली असेल तर तुम्ही त्याला चार मारा, असं वक्तव्य करत कृषिमंत्री सत्तारांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे. त्यामुळं आता मराठवाड्यात शिंदे समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत सदस्याला मेजॉरिटी कळते, यांना का नाही कळत- सत्तार

ग्रामपंचायतीच्या सदस्याला मेजॉरिटी कळते परंतु उद्धव ठाकरेंना कळत नाहीये. ठाकरे मुख्यमंत्री असताना ते निवेदनं घेऊन मागे द्यायचे, त्यावर काहीही कार्यवाही व्हायची नाही. परंतु आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवेदनं घेतात आणि प्रश्नही सोडवतात. हिंदू गर्व गर्जना यात्रेनिमित्त अब्दुल सत्तार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

चार-पाच खासदार आणखी येणार- सत्तार

आगामी काळात आणखी दोन ते तीन आमदार आणि चार ते पाच खासदार हे शिदे गटाला पाठिंबा देणार आहेत, असा मोठा गौप्यस्फोट कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केला आहे. तुमच्या भागातील अधिकारी तुमचं काम करत असेल तर तो तुमच्यावर उपकार करत नाहीये. ते त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळं कुणाचाही दबाब सहन करू नका, जशास तसं उत्तर द्या, असा सल्ला मंत्री सत्तारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

IPL_Entry_Point