Nanded Accident: नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकची भीषण धडक, अपघातात पाच मजुरांचा जागीच मृत्यू
Nanded Accident: रेल्वेच्या कामासाठी आलेल्या ५ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
Nanded Accident: नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जण ठार झाले आहेत. सोनारीफाटा करंजी जवळ दोन वाहनांची धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी हिमायतनगर इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोनारीफाटा करंजीजवळ ट्रक आणि आयशर टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली, ही धकड इतकी भीषण होती की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कामगारांचा समावेश आहे.
बिहारमधून कामासाठी आलेल्या पाच जणांवर काळाने घाला घातला. हे सर्वजण रेल्वेच्या कामासाठी आले होते. तसंच हिमायतनगर परिसरात ते राहत होते. दिवसभर काम आटोपून ते रात्री त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी निघाले होते. त्यावेळी आयशर टेम्पोला एका सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.
अपघातातील जखमी कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बीडी भुसनुर, सहायक पोलिस निरीक्षक महाजन यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी करत आहेत. आयशर टेम्पोचा चालक हा भोकर इथला रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित बातम्या