मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Train : देशातील ‘या’ मार्गांवर ८२ जादा रेल्वे सुटणार; सणासुदीत रेल्वेचा मोठा निर्णय

Train : देशातील ‘या’ मार्गांवर ८२ जादा रेल्वे सुटणार; सणासुदीत रेल्वेचा मोठा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 25, 2022 09:18 AM IST

Festival Special Train : सध्या सणासुदीचा काळ सुरू होत असल्यानं अनेक मार्गावरील रेल्वेंची तिकीटं फुल झाली आहेत. त्यामुळं वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वेनं फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन सुरू केल्या आहेत.

Festival Special Train
Festival Special Train (HT)

Festival Special Train : कोरोना महामारी संपल्यानंतर आता रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय आगामी काळात सणासुदीनिमित्त लोक आपापल्या घरी किंवा फिरायला बाहेर जात असतात. त्यामुळं सध्या रेल्वेची पुढील काही दिवसांची तिकीटं फुल असल्यानं आता देशभरात मध्य रेल्वेनं 82 फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता ऐन सणासुदीच्या काळातही प्रवाशांना रेल्वेतून गर्दीशिवाय प्रवास करता येणार आहे. दसरा, दिवाळी आणि छट उत्सवामुळं प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे 82 फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवणार आहे. काय असेल त्याचं वेळापत्रक आणि मार्ग, जाणून घेऊयात.

१. दादर - बलिया त्रिसाप्ताहिक विशेष (26 सेवा)

01025 स्पेशल दादर टर्मिनस येथून दि. 3.10.2022 ते 31.10.2022 पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 14.15 वाजता सुटेल आणि बलिया येथे तिसऱ्या दिवशी 01.45 वाजता पोहोचेल.

01026 स्पेशल दि. 5.10.2022 ते 2.11.2022 पर्यंत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी 15.15 वाजता बलिया येथून सुटेल आणि दादर टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी 03.35 वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, हरदा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, महाराज छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, ज्ञानपूर, वाराणसी, औंड़िहार, मऊ आणि रसड़ा.

संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, 3 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 गार्ड ब्रेक व्हॅन.

२. दादर - गोरखपूर आठवड्यातून चार दिवस विशेष (36 सेवा)

01027 विशेष दादर येथून दि. 1.10.2022 ते 30.10.2022 पर्यंत दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी 14.15 वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी 02.45 वाजता पोहोचेल.

01028 विशेष गोरखपूर येथून दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 3.10.2022 ते 1.11.2022 पर्यंत 14.25 वाजता सुटेल आणि दादर येथे तिसऱ्या दिवशी 03.35 वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, महाराज छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड, वाराणसी, औंड़िहार, मऊ, भटनी, देवरिया सदर.

संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, 3 तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 2 गार्ड ब्रेक व्हॅन.

३. मुंबई - नागपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (4 सेवा)

01033 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. 22.10.2022 आणि 29.10.2022 रोजी 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.32 वाजता नागपूरला पोहोचेल.

01034 विशेष गाडी दि. 23.10.2022 आणि 30.10.2022 रोजी नागपूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, 8 तृतीय वातानुकूलित, 4 शयनयान, 5 जनरल सेकंड क्लास ज्यामध्ये गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन आहे.

४. मुंबई- मालदा टाऊन साप्ताहिक विशेष (4 सेवा)

01031 अतिजलद विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. 17.10.2022 आणि 24.10.2022 रोजी 11.05 वाजता सुटेल आणि मालदा टाउन येथे तिसऱ्या दिवशी 00.45 वाजता पोहोचेल.

01032 स्पेशल मालदा टाउन येथून दि. 19.10.2022 आणि 26.10.2022 रोजी 12.20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 03.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, किउल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहालगाव, साहिबगंज, बड़हरवा आणि न्यू फरक्का.

संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, 8 तृतीय वातानुकूलित, 4 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 1 गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन आहे.

५. लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष (4 सेवा)

02105 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 19.10.2022 आणि 26.10.2022 रोजी 05.15 वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी 17.15 वाजता पोहोचेल.

02106 विशेष गोरखपूर येथून दि. 21.10.2022 आणि 28.10.2022 रोजी 03.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई झांसी, उरई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज जंक्शन, ज्ञानपूर रोड, बनारस, वाराणसी, औंड़िहार, मऊ, बेलथारा रोड, देवरिया सदर.

संरचना: एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 8 सामान्य द्वितीय श्रेणीचे ज्यामध्ये 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन.

६. लोकमान्य टिळक टर्मिनस- समस्तीपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (8 सेवा)

01043 विशेष दि. 20.10.2022 ते 30.10.2022 पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी आणि गुरुवारी 12.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21.15 वाजता समस्तीपूरला पोहोचेल.

01044 स्पेशल दि. 21.10.2022 ते 31.10.2022 पर्यंत दर सोमवारी आणि शुक्रवारी 23.30 वाजता समस्तीपूरहून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी 07.40 वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर.

संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, 8 तृतीय वातानुकूलित, 4 शयनयान आणि 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये 1 गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण: 01025, 01027, 01033/01034, 01031, 02105 आणि 01043 या विशेष ट्रेन्ससाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. 25.9.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co. या.

IPL_Entry_Point