मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Khadse: खडसेंच्या 'घरवापसी'च्या चर्चेवर राष्ट्रवादीचा खुलासा; दिली वेगळीच माहिती

Eknath Khadse: खडसेंच्या 'घरवापसी'च्या चर्चेवर राष्ट्रवादीचा खुलासा; दिली वेगळीच माहिती

Sep 24, 2022, 02:39 PM IST

    • NCP on Eknath Khadse Delhi Visit: एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर वेगळाच खुलासा केला आहे.
Eknath Khadse

NCP on Eknath Khadse Delhi Visit: एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर वेगळाच खुलासा केला आहे.

    • NCP on Eknath Khadse Delhi Visit: एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर वेगळाच खुलासा केला आहे.

NCP on Eknath Khadse Delhi Visit: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्लीला गेल्यामुळं त्यांच्या घरवापसीच्या चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर तात्काळ खुलासा करताना या संदर्भात काही वेगळीच माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खडसे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. ‘ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या संदर्भातील ती बातमी होती. प्रत्यक्षात खडसे आणि अमित शाह यांची भेट झालेलीच नाही. त्यांच्यात केवळ फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची बातमी निराधार आहे,’ असं तपासे म्हणाले.

याविषयी त्यांनी अधिकची माहितीही दिली. 'अमित शहा यांची भेट घ्यायला जाण्याच्या आधी एकनाथ खडसे यांनी याबाबतची पूर्ण माहिती शरद पवार साहेबांना दिली होती. खरंतर पवार साहेबांच्या उपस्थितीतच ते अमित शहा यांची भेट घेणार होते. ते एकटे जाणार नव्हते. पवार साहेबांच्या सोबतच जाणार होते, असा गौप्यस्फोटही तपासे यांनी केला आहे. 

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वासह पक्षात अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळं पक्ष सोडून इतरत्र जाण्याची त्यांच्याबद्दलची चर्चा चुकीची आहे. अशी कुठलीही परिस्थिती नाही, असं तपासे यांनी म्हटलं आहे.

'अमित शहांना भेटू नये असा काही नियम आहे का?'

खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं आहे. ‘मला याविषयी काही कल्पना नाही’, असं त्यांनी म्हटलं आहे. तर, खुद्द खडसे यांनीही अमित शहा यांच्या भेटीविषयी खुलासा केला आहे. ‘अमित शहा यांना मी यापूर्वी देखील अनेकदा भेटलो आहे. यापुढंही भेटत राहणार आहे. त्यांना भेटू नये असा काही नियम आहे का?,’ असं प्रतिप्रश्नही खडसे यांनी केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस जेव्हा गोधडीत होते, तेव्हापासून माझे अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत,’ असा चिमटाही खडसे यांनी यावेळी काढला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा