मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fadnavis on Khadse: एकनाथ खडसेंच्या घरवापसीवर फडणवीसांचं चार शब्दांत उत्तर, म्हणाले...

Fadnavis on Khadse: एकनाथ खडसेंच्या घरवापसीवर फडणवीसांचं चार शब्दांत उत्तर, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 24, 2022 02:56 PM IST

Devendra Fadnavis on Eknath Khadse joining BJP: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ते भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे.

Deputy CM Devendra Fadnavis On Eknath Khase Join BJP
Deputy CM Devendra Fadnavis On Eknath Khase Join BJP (PTI)

Devendra Fadnavis On Eknath Khadse Joining BJP : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ते पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर एकनाथ खडसेंनी स्वत: स्पष्टीकरण दिल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चार शब्दांत खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद आणि मतभेद जगजाहीर आहेत. खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार का, असा प्रश्न पत्रकारांनी फडणवीसांना विचारल्यानंतर त्यांनी 'मला याबाबत काही कल्पना नाही', असं म्हणत बोलणं आटोपतं घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आता खडसेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना आणखी उधान आलं आहे.

खडसे आणि शहा यांची भेट झाल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यावर खडसेंनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, मी अमित शहांना एकदा नाही तर अनेकदा भेटलो आहे आणि यापुढेही भेटत राहणार आहे. शहांना भेटू नये, असा काही नियम आहे का?, फडणवीस जेव्हा गोधडीत होते, तेव्हापासून माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. असा टोला खडसेंनी फडणवीसांना लगावला होता.

दरम्यान २०१४ साली महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर सुरुवातीच्या काळात महसूलमंत्री राहिलेल्या एकनाथ खडसेंना भोसरीतील जमीन खरेदी व्यवहारामुळं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी सातत्यानं अनेक व्यासपिठांवरून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. २०१९ साली विधानसभेत अखेरचं भाषण करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. परंतु गेल्या वर्षीच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीनं त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणलं आहे. त्यामुळं आता खडसे भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीतच राहणार, याबाबत संभ्रम कायम आहे.

IPL_Entry_Point