मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya Sule: सुप्रिया सुळे खरंच सीएमच्या खुर्चीत बसल्या होत्या? राष्ट्रवादी म्हणते…

Supriya Sule: सुप्रिया सुळे खरंच सीएमच्या खुर्चीत बसल्या होत्या? राष्ट्रवादी म्हणते…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 24, 2022 07:23 PM IST

NCP attacks Eknath Shinde Camp: खासदार सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Supriya Sule
Supriya Sule

NCP warns Sheetal Mhatre: एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून काम करत असल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर व त्यावरून उलटसुलट चर्चा झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा त्याच पद्धतीचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो मॉर्फ केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला असून कारवाईचा इशारा दिला आहे. 

श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा एक व्हिडिओ काल राष्ट्रवादीनं शेअर केला होता. त्यावरून श्रीकांत शिंदे हे 'सुपर सीएम' झाल्याची टीकाही विरोधकांनी केली होती. खुद्द श्रीकांत शिंदे यांनी त्यावर खुलासा केला होता. हा माझ्या घरातील कार्यालयातला फोटो आहे. तिथं मी आणि मुख्यमंत्री साहेब दोघेही बसत असतो. मी खुर्चीवर बसलेलो असताना मागे मुख्यमंत्र्यांचा बोर्ड अनावधनाननं राहिला. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असं श्रीकांत शिंदे म्हणाले होते. 

श्रीकांत शिंदे यांच्या खुलाशानंतर हे प्रकरण शांत होत असतानाच आता एकनाथ शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतील फोटो शेअर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 'शीतल म्हात्रे यांनी फोटो मॉर्फ करून पोस्ट केला आहे. त्यातून सुप्रियाताईंची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतू स्पष्ट दिसत आहे. मुंबई पोलीस व सायबर पोलिसांनी यावर त्वरित कारवाई करावी. म्हात्रे यांनी सुप्रिया सुळेंची माफी मागून पोस्ट डिलीट करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे क्लाइड क्रास्टो यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही शिंदे गटावर कडवट शब्दांत टीका केली आहे. 'दुसऱ्या कोणाच्याही खुर्चीवर बसण्याची परंपरा पवार घराण्याची किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही. दुसऱ्याची खुर्ची खेचून त्याच्यावर बसण्याची संस्कृती कोणाची आहे हे सबंध महाराष्ट्राला माहीत आहे, असा टोला त्यांनी हाणला आहे.

IPL_Entry_Point

विभाग