मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /   Eknath Khadse: माझा विजय 'ही' त्यांना चपराक; एकनाथ खडसे यांचा रोख कुणाकडे?

Eknath Khadse: माझा विजय 'ही' त्यांना चपराक; एकनाथ खडसे यांचा रोख कुणाकडे?

Jun 20, 2022, 10:29 PM IST

    • Vidhan Parishad Election Results 2022: विधान परिषदेच्या निवडणुकीत अतिरिक्त मतं घेऊन विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 
Eknath Khadse

Vidhan Parishad Election Results 2022: विधान परिषदेच्या निवडणुकीत अतिरिक्त मतं घेऊन विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

    • Vidhan Parishad Election Results 2022: विधान परिषदेच्या निवडणुकीत अतिरिक्त मतं घेऊन विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Eknath Khadse on MLC Election Results: राज्य विधान परिषदेचा निकाल आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय कटुता वाढलेले एकनाथ खडसे हे ठरलेल्या कोट्यापेक्षा अधिक मतं घेऊन निवडून आले आहेत. त्यांच्या विजयाची जोरदार चर्चा आहे. एकनाथ खडसे यांनी या निकालावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची परेड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी थेट उल्लेख न करता भाजप व भाजपमधील नेत्यांना टोले हाणले. ‘नाथाभाऊ विधान परिषदेत जाऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. माझा विजय ही त्यांना चपराक आहे. ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिकची मतं मला मिळाली आहेत. ती मतं भाजपमधील माझ्या मित्रांनी दिली असावीत, असं मला वाटतं, असं ते म्हणाले. 'राष्ट्रवादी काँग्रेसकडं ५१ मतं होती. मात्र, आम्हाला ५३ मिळाली. काही अपक्षांनीही आम्हाला मदत केली, असं म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

'मागच्या सहा वर्षांत राजकीय जीवनात मला प्रचंड त्रास झाला. माझा छळ करण्यात आला. विनाकारण आरोप करण्यात आले. भूखंडाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. जावयांनी गाडी घेतल्यावरून मला घेरण्यात आलं. दाऊदशी माझे संबंध जोडले गेले. ईडीची चौकशी सुरू झाली. माझ्या जावयाला अटक करण्यात आली. माझ्या बायकोला, मुलाला, दोन्ही मुलींना समन्स पाठवण्यात आली. सर्व प्रॉपर्टी सील करण्यात आली. राहतं घरही मोकळं करावं असा आदेश काढला गेला. मला बेघर करण्याचा प्रयत्न केला गेला. अजूनही छळ थांबलेला नाही. हे सगळं मी सहन करत आलो. राजकीय विजनवासात असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं मला मदतीचा हात दिला. शरद पवार साहेबांनी, अजितदादा, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी मला विधान परिषदेवर संधी दिली. माझं राजकीय पुनर्वसन केलं. त्यांचा मी आभारी आहे. आता पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करेन, असं ते म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा