मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धरणात लघुशंका करणारे आता इतिहासातही लघुशंका करायला निघालेत; धनंजय देसाईंची अजित पवारांवर टीका

धरणात लघुशंका करणारे आता इतिहासातही लघुशंका करायला निघालेत; धनंजय देसाईंची अजित पवारांवर टीका

Jan 22, 2023, 05:06 PM IST

    • Dhananjay Desai On Ajit Pawar : पुण्यात हिंदूत्ववादी संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला आहे. मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर तोफ डागली आहे.
Dhananjay Desai On Ajit Pawar (HT)

Dhananjay Desai On Ajit Pawar : पुण्यात हिंदूत्ववादी संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला आहे. मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर तोफ डागली आहे.

    • Dhananjay Desai On Ajit Pawar : पुण्यात हिंदूत्ववादी संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला आहे. मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर तोफ डागली आहे.

Dhananjay Desai On Ajit Pawar : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलं होतं. त्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर असल्याचा दावा करत भाजपसह हिंदुत्ववादी संघटना अजित पवारांविरोधात आक्रमक झाल्या आहे. कोल्हापूर, यवतमाळनंतर आता आज पुण्यातही हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला असून त्यात मोठ्या संख्येनं नागरिक सामील झाले. यावेळी मोर्चात हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाई यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना धनंजय देसाई म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं म्हणणारे शाहिस्तेखान किंवा अफजलखान यांच्या कुळातील आहेत. यापूर्वी धरणात लघुशंका करण्यासाठी भाषा करणारे आता इतिहासातही लधुशंका करायला निघाल्याचं म्हणत धनंजय देसाई यांनी अजित पवारांना जोरदार टोला हाणला आहे. कदाचित तु्म्ही पवार नसाल परंतु छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते, असंही धनंजय देसाई यांनी म्हटलं आहे. याशिवाय भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीदेखील पुण्यातील हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभाग घेतला आहे. संभाजी महाराज हे धर्मवीरच होते, त्यामुळं आता हा विषय संपायला हवा, असं वक्तव्य शिवेंद्रराजे यांनी केलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यातील लाल महाल ते डेक्कन असा जनआक्रोश मोर्चा काढला आहे. या हिंदू जनआक्रोश मोर्चात भाजप आमदार भीमराव तापकीर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर, संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे आणि धनंजय देसाई हे सहभागी झाले होते.