मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह लिखाण करणं भाजप नेत्याला भोवलं.. जिल्ह्यातून हद्दपार

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह लिखाण करणं भाजप नेत्याला भोवलं.. जिल्ह्यातून हद्दपार

Jan 27, 2023, 05:09 PM IST

  • Offensive Remark Against Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल भाजप नेत्यावर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह लिखाण करणं भाजप नेत्याला भोवलं

Offensive Remark Against Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल भाजप नेत्यावर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

  • Offensive Remark Against Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल भाजप नेत्यावर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वेश्या व्यवसायाला सरकारने मान्यता देऊन हा व्यवसाय अधिकृत करावा असे वक्तव्य केले होते.  यावर भाजपमधील एका मोठ्या नेत्याने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित नेत्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

अमृता फडणवीस यांच्याविषयी सोशल मीडियात आक्षेपार्ह व अश्लील लिखाण करणाऱ्या  भाजप  नेत्याला पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली आहे. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे घडला आहे. खेमचंद गरपल्लिवार असे कारवाई करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव असून त्यांनी व त्यांच्या पत्नीने काही महिन्यापूर्वीत सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

खेमचंद गरपल्लिवार यांनी अमृता फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण  केल्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी गरपल्लिवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. गरपल्लिवार यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळे गोंडपिपरी पोलिसांनी गरपल्लिवार यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ ( १ ) ( अ ) ( ब ) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपविभागिय अधिकारी गोंडपिपरी यांचेकडे पाठविला असता याला मंजुरी देण्यात आली.