मराठी बातम्या  /  Business  /  Elon Musk Changes Twitter Name To Mr Tweet And This Might Be The Reason

Elon Musk चा आणखी एक कारनामा, Twitter पर स्वत:चे नाव बदलून ठेवले Mr. Tweet, कारण..

Elon Musk
Elon Musk
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Jan 27, 2023 04:32 PM IST

Elon Musk changes Twitter name : ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटरवर आपले नाव बदलून मिस्टर ट्विट असे ठेवले आहे. मात्र असून करून ते स्वत:च्याच नियमात अडकले असून त्यांना पुन्हा आपले नाव सुधारता येणार नाही.

नवी दिल्ली – जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने (Elon Musk )पुन्हा एकदा आपल्या कारनाम्याने सर्वांना चकीत केले आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहणाऱ्या एलन मस्कने आता स्वत:चे नावच बदलले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एलन मस्क यांना आपले नाव बदलण्याची इच्छा झाली आणि त्यांनी याची घोषणा आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून केली. एलन मस्क यांनी आपले नवे नाव मिस्टर ट्वीट (Mr. Tweet) ठेवले आहे.

ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांचा हा कारनामा तुम्हाला थोडा विचित्र वाटू शकतो, कारण ट्विटर वर नाव बदलणे म्हणजे पुन्हा त्यामध्ये कोणताही बदल न करू शकणे आहे. ट्विटरच्या नव्या पॉलिसीनुसार असे करणे शक्य होणार नाही. म्हणजे ट्विटर यूजरला आपल्या नावाबाबत छेडाछाड करण्याची परवानगी नाही.

दरम्यान जर एकाद्या यूजरने असे केले गेले तर एकदा नावात केलेल्या बदलानंतर पुन्हा सुधारले जाऊ शकत नाही. दरम्यान हे प्रकरण ट्विटरच्या मालकाशी संबंधत आहे. अशा तऱ्हेने एलन मस्क यांनी आपले नाव बदलून ट्विटर यूजर्संचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. मात्र हे पूर्ववत कसे करणार, हे कुणालाही समजण्यापलीकडचे आहे.

एलन मस्क यांनी स्वत:ला दिले यूनिक नाव -

एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर हँडल वर स्वत:चे नाव मिस्टर ट्वीट ठेवले आहे. दरम्यान हे नाव युनिक श्रेणीत येते. एलन मस्क सतत आपल्या ट्वीटच्या माध्यमातून नवनवीन घोषणा करत ट्विटर यूजर्संना आश्चर्याचे धक्के देत असतात. अशामुळे सर्वांची नजर एलन मस्क यांच्या ट्विटरवर असते.

दुसरीकडे आपले नाव बदलल्यामुळे असे मानले जात आहे की, एलन मस्कही मानतात की, ते ट्वीट करण्याच्या कलेत माहीर आहेत व नेहमी सर्वाच्या पुढे राहतात.

WhatsApp channel

विभाग