मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आईचा मुलीनेच काढला काटा, प्रियकराच्या मदतीने दाबला जन्मदात्रीचा गळा

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आईचा मुलीनेच काढला काटा, प्रियकराच्या मदतीने दाबला जन्मदात्रीचा गळा

Aug 19, 2022, 11:52 PM IST

    • प्रेमाला विरोध करणाऱ्या आईचा मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केला आहे. ही धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे घडली.
इनसेटमध्ये आरोपी

प्रेमाला विरोध करणाऱ्या आईचा मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केला आहे. ही धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे घडली.

    • प्रेमाला विरोध करणाऱ्या आईचा मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केला आहे. ही धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे घडली.

गडचिरोली – पोटच्या मुलीनेच जन्मदात्या आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे उघडकीस आली आहे. प्रेमाला विरोध करणाऱ्या आईचा मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केला आहे. आईच्या कडक स्वभावामुळे बिनधास्त वागता येत नाही म्हणून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलीने टोकाचा निर्णय घेत आईला संपवले. 

ट्रेंडिंग न्यूज

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

 

पोलिसांनी आरोपी मुलगी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपी मुलीचे नाव उर्मिला आत्राम तर तिच्या प्रियकराचे नाव रुपेश येनगंदलवार आहे. मृत महिलेचे नाव निर्मला आत्राम असे आहे. 

अहेरी येथील निर्मला आत्राम मुलीसह रहात होत्या. घरकाम करून त्या आपला व आपल्या मुलीचा उदरनिर्वाह करत होत्या. निर्मला यांचे पती पोलीस दलात होते. मात्र २० वर्षापूर्वी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ते शहीद झाले होते. आरोपी उर्मिला वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर पोलीस भरतीची तयारी करत होती. मात्र आता आईच्या हत्येप्रकरणी तिला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 

शुक्रवारी पहाटे उर्मिला एका तरुणासोबत संशयास्पदरित्या फिरत होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिने आईचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली असता त्यांना हत्येचा प्रकार समजला. पोलिसी खाक्या दाखवताच मुलगी उर्मिलाने गुन्हा कबूल केला व आपल्या प्रियकर रुपेश येनगंदलवारला सोबत घेऊन आईची गळा दाबून हत्या केल्याचं सांगितले. हत्या प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा