मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Lok sabha Bypoll : पुणे लोकसभेच्या जागेवरून मविआत रस्सीखेच, बालेकिल्ला राखण्यासाठी भाजपचा प्लॅन काय?

Pune Lok sabha Bypoll : पुणे लोकसभेच्या जागेवरून मविआत रस्सीखेच, बालेकिल्ला राखण्यासाठी भाजपचा प्लॅन काय?

May 30, 2023, 05:59 PM IST

  • Pune Lok Sabha Bypoll : येत्या काही दिवसांत पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच आता मविआतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

NCP vs Thackeray Group On Pune Loksabha Bypoll (HT)

Pune Lok Sabha Bypoll : येत्या काही दिवसांत पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच आता मविआतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

  • Pune Lok Sabha Bypoll : येत्या काही दिवसांत पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच आता मविआतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

NCP vs Thackeray Group On Pune Loksabha Bypoll : भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा मतदारसंघात येत्या काही दिवसांत पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने कर्नाटकातून तब्बल ४२०० ईव्हीएम मशीन्स पुण्यात आणले आहे. तसेच निवडणुकीच्या स्थितीबाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. त्यामुळं येत्या दोन आठवड्यांत पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु आता निवडणूक जाहीर झालेली नसताना पुण्यातील जागेवरून महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर थेट दावा ठोकत ठाकरे गट आणि काँग्रेसवर जोरदार कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर काँग्रेससह ठाकरे गटानेही पुण्याच्या जागेवर दावा ठोकत राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

आघाडी-युती धर्मानुसार पुण्याची जागा कुणाची?

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असताना पुणे लोकसभा मतदासंघाची जागा नेहमीच काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते विश्वजित कदम यांनी तर २०१९ मध्ये काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तर २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीत पुण्याची जागा भाजपकडेच होती. त्यामुळं पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने नव्याने दावा केला आहे. परंतु आता महाविकास आघाडीत अद्याप लोकसभेसाठीचं जागावाटप झालेलं नाही. त्यामुळं तिन्ही पक्षातील नेते एकत्र बसल्यानंतरच पुण्याची जागेबाबतचा पेच सुटणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद जास्त?

पुणे लोकसभा मतदारसंघात शहरातील तब्बल सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा पेठ, कोथरूड, पर्वती आणि पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील चार मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक आमदार आहे. आमदारांची संख्या जास्त असल्यामुळं भाजपला पुणे लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभेसाठी भाजपची रणनीती काय?

गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुण्यात भाजपकडे कोणताही बडा स्थानिक नेता राहिलेला नाही. मंत्री चंद्रकांत पाटील कोथरुडमधून आमदार आहेत, परंतु त्यांना विधानसभेपूर्वी भाजपकडून अचानक पुण्यात लँड करण्यात आल्यामुळं त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांचा मोठा विरोध असल्याचं बोललं जात आहे. कसब्यात टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्यामुळे तोंड पोळलेला भाजप लोकसभेसाठी मात्र ताकही फुंकून पित आहे. बापटांच्या सून स्वरदा बापट यांचं नाव पोटनिवडणुकीसाठी आघाडीवर आहे. दुसरीकडे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी मुंबईसह दिल्लीत जोरदार फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं भाजपच्या विजयाचं गणित हे संपूर्णत: उमेदवारी कुणाला मिळते, यावर अवलंबून असणार आहे.

महाविकास आघाडीतून कुणाची नावं चर्चेत?

पुणे शहरात माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्यानंतर भाजपच्या गडाला सुरुंग लावेल असा एकही नेता काँग्रेसकडे नाहीय. विश्वजित कदम, मोहन जोशी, रमेश बागवे किंवा अरविंद शिंदे यांना पुण्याचं मैदान मारता आलेलं नाही. २०१९ च्या विधानसभेत पुणे शहरातून काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नव्हता. कसब्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली. त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हत्तीचं बळ निर्माण झालंय. दुसरीकडे पुणे शहरात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. त्यामुळंच अजित पवार यांनी आमदारांच्या शक्तीच्या बळावर पुण्याच्या जागेवर दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीकडून आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि जेष्ठ नेते अंकुश काकडे यांची नावं चर्चेत आहे.