मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde Dasara Melava : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात गोंधळ, पोलिसांनी लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना पांगवले

Pankaja Munde Dasara Melava : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात गोंधळ, पोलिसांनी लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना पांगवले

Oct 05, 2022, 03:53 PM IST

    • Pankaja Munde Dasara Melava : बीड येथे सावरगाव या ठिकाणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे मुंडे यांच्या सभेला लालबोट लागले आहे.
Pankaja Munde Dasara Melava

Pankaja Munde Dasara Melava : बीड येथे सावरगाव या ठिकाणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे मुंडे यांच्या सभेला लालबोट लागले आहे.

    • Pankaja Munde Dasara Melava : बीड येथे सावरगाव या ठिकाणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे मुंडे यांच्या सभेला लालबोट लागले आहे.

बीड : भापजच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा आज सावरगाव येथे दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात मुंडे यांच्या भाषणानंतर अचानक मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे स्टेजजवळ गेल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे परिस्तिती आणखीनच चिघळली. दरम्यान, पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते हे स्टेजकडे गेल्याने तसेच काहींना मुंडे यांच्या सोबत फोटो काढायचा असल्याने मोठी गर्दी झाली आणि ती पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याची प्राथमिक महिती मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

chicken shawarma news : धक्कादायक! मुंबईत रस्त्यावरील निकृष्ट चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू; दोघांना अटक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथे दसरा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी कायम संघर्ष करत राहणार असल्याचे सांगितले. या मेळाव्यात त्यांनी अनेक खुलासे केले. त्यांच्या या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे जमले होते. पंकजा मुंडे यांच्या भाषणांनंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे स्टेजकडे गेले. यावेळी काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाले. तसेच मोठ्या प्रमाणात स्टेज जवळ गर्दी झाल्याने हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी करत पोलीस आणि कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र पंकजा मुंडे यांचे भाषण झाल्यावर पुन्हा कार्यकर्ते हे स्टेज जवळ गेले आणि पंकजा मुंडे यांच्याकडे फोटोचा आग्रह धरला. यामुळे मोठा गोंधळ झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केला.

दरम्यान, या लाठीचार्जमुळे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला गालबोट लागले आहे. या मेळाव्यातून मुंडे यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवून दाखवली आहे. मात्र, त्यांच्या भाषणानंतर झालेला गोंधळ कशामुळे झाला याची माहिती देखील घेतली जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा