मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Fire : पुण्यातील स्वारगेट परिसरात दुकानांमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Pune Fire : पुण्यातील स्वारगेट परिसरात दुकानांमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Jan 26, 2023, 06:48 PM IST

  • Pune swargate Fire : गॅस कटरमधून उडालेल्या ठिणगीमुळं पुण्यातील स्वारगेटमध्ये अनेक दुकानांमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Fire Incident In Swargate Pune (HT)

Pune swargate Fire : गॅस कटरमधून उडालेल्या ठिणगीमुळं पुण्यातील स्वारगेटमध्ये अनेक दुकानांमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Pune swargate Fire : गॅस कटरमधून उडालेल्या ठिणगीमुळं पुण्यातील स्वारगेटमध्ये अनेक दुकानांमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Fire Incident In Swargate Pune : पुणे शहरातील स्वारगेट परिसरातील तीन दुकानांमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. दुपारच्या सुमारास ही आग लागली असून त्यात भंगाराचे दुकान, गादी घर आणि रद्दी डेपो अशी तीन दुकानं जळून खाक झाली आहे. त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्णपणे आग विझवली आहे. शेजारच्या दुकानात गॅस कटरमधून आगीची ठिणगी पडल्यानं ही आग लागल्याचं बोललं जात आहे. दुकानांना लागलेल्या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नसून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, एका दुकानात गॅस कटरच्या सहाय्यानं दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यावेळी गॅस कटरमधून उडालेल्या ठिणगीतून शेजारच्या दुकांनामध्ये आगडोंब उसळला. दुकानांमध्ये रद्दीचं भांडार असल्यामुळं काही मिनिटांतच आगीनं उग्र रुप धारण केलं. स्वारगेटसारख्या अत्यंत वर्दळीच्या भागात आग लागल्याची घटना लक्षात येताच नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग संपूर्णपणे विझवली असून दुकानांमध्ये कूलिंगचं काम सुरू करण्यात आलं आहे.

अग्निशमन दलामुळं मोठा अनर्थ टळला...

स्वारगेटमधील तीन दुकानांमध्ये भीषण आग लागल्याची घटना समजताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर स्थानिकांसह जवानांनी काही मिनिटांतच संपूर्ण आग आटोक्यात आणली. परंतु या आगीत तीन दुकानं जळून खाक झाली असून लाखोंच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा