मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: सोनाराच्या धाडसाला सलाम; दुकान लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांना शिकवला चांगलाच धडा!

Viral Video: सोनाराच्या धाडसाला सलाम; दुकान लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांना शिकवला चांगलाच धडा!

May 29, 2023, 03:54 PM IST

  • Mira Road Jeweller: मीरा रोड येथील ज्वेलर्सचे दुकान लुटायला आलेल्या चोरट्यांचा दुकानदाराने डाव हाणून पाडला.

Viral Video

Mira Road Jeweller: मीरा रोड येथील ज्वेलर्सचे दुकान लुटायला आलेल्या चोरट्यांचा दुकानदाराने डाव हाणून पाडला.

  • Mira Road Jeweller: मीरा रोड येथील ज्वेलर्सचे दुकान लुटायला आलेल्या चोरट्यांचा दुकानदाराने डाव हाणून पाडला.

Mira Road Viral Video: बंदुकीच्या धाक दाखवून सोनारचे दुकान लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांना एका सोनाराने चांगलाच धडा शिकवला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मीरा रोड पूर्व येथे शनिवारी तोंडावर मास्क लावून दोन अज्ञात तरुण कोठारी ज्वेलर्स दुकानात शिरले. त्यानंतर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून सोनाराला लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु, सोनाराने धाडस दाखवून चोरट्यांचा डाव हाणून पाडला.

ट्रेंडिंग न्यूज

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

Pune :नवीन मोटार घेतल्यानंतर दर्शन घेऊन निघालेल्या तिघांवर काळाचा घाला; लोणीकंद- थेऊर रस्त्यावर ट्रक मोटारीचा भीषण अपघात

Mumbai Train Accident : मुंबईच्या 'लाईफ लाईन'ने घेतला दोघांचा बळी; डोंबिवलीतील तरुण तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील कोठारी ज्वेलर्समध्ये दोन चोरटे शिरले. त्यांनी दुकानदाराला सोन्याची अंगठी दाखवण्यास सांगितले. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क आणि हालचाल पाहून दुकानदाराला त्यांच्यावर संशय आला. त्यानंतर सोनाराने दुकानातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, दुकानदाराने आपला जीव धोक्यात टाकून दुकानात ठेवलेल्या रोखंडी रॉडने चोरट्यांचा सामना केला. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

यापूर्वी ६ मे २०२३ रोजी भायंदर पश्चिम येथे एका अल्पवयीन मुलाने खोट्या बंदुकीचा धाक दाखवून शक्ती ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा