मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narayan rane : उद्धव ठाकरे सरपंचपदाच्याही लायकीचे नाहीत, 'ती' केस संपलेली नाही, नारायण राणेंचा इशारा

Narayan rane : उद्धव ठाकरे सरपंचपदाच्याही लायकीचे नाहीत, 'ती' केस संपलेली नाही, नारायण राणेंचा इशारा

Aug 31, 2022, 05:54 PM IST

    • सुशांत सिंह राजपूत व दिशा सालियान केस अजूनही बंद केलेली नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे साधे सरपंच होण्याच्याही लायकीचे नाहीत, असा घणाघात राणेंनी (Narayan rane) केला आहे.
नारायण राणेंचा इशारा

सुशांत सिंह राजपूत व दिशा सालियान केस अजूनही बंद केलेली नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे साधे सरपंच होण्याच्याही लायकीचे नाहीत, असा घणाघात राणेंनी (Narayanrane) केला आहे.

    • सुशांत सिंह राजपूत व दिशा सालियान केस अजूनही बंद केलेली नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे साधे सरपंच होण्याच्याही लायकीचे नाहीत, असा घणाघात राणेंनी (Narayan rane) केला आहे.

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह राजपूत व दिशा सालियान केस अजूनही बंद केलेली नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे साधे सरपंच होण्याच्याही लायकीचे नाहीत, असा घणाघात राणेंनी (Narayan rane) केला आहे. जुहू येथील निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापणा केल्यानंतर राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

यावेळी नारायण राणे म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी महाराष्ट्रावरील विघ्न टळलं आहे. आता राज्य विकासाच्या मार्गावर घोडदौड करेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लोकांवर अन्याय होणार नाही. सुशांत राजपूत आणि दिशावर अत्याचार करून ठार मारण्यात आले. असले प्रकार यापुढे होणार नाहीत. सुशांत आणि दिशाची केस अजूनही संपली नाही. भविष्यात असं घडू नये म्हणून शिंदे सरकार निश्चितच प्रयत्न करेल. असे म्हणत उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) टोला लगावला. 

एकनाथ शिंदेंवर कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका करणारे उद्धव ठाकरेच (uddhav thackeray) कंत्राटी मुख्यमंत्री होते. राज्याच्या इतिहासात इतक्या अपमानित पद्धतीने कुणाला पायउतार व्हावं लागलं नसेल. घरात बसून मुख्यमंत्रिपद सांभाळायचे. अडीच वर्षात मंत्रालयात ३ तास गेले. ही कारकिर्द. राज्यातील जनतेला काय मिळालं? मराठी माणसाला काय दिले? हिंदुत्वासाठी काय केले? उद्धव ठाकरेंना निवृत्ती मिळालीय आता गपचुप घरी बसा. तुम्हाला जे काही मिळाले हे साहेबांच्या नावावर मिळाले. उद्धव ठाकरे हे सरपंच होण्याच्याही लायकीचे नाहीत असा घणाघात नारायण राणेंनी केला.  शिवसेनेत नेतृत्त्व, नेते कुठे आहेत. बाळासाहेबांसाठी जीव अर्पण करणारे शिवसैनिक होते. त्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंना सांभाळता आले नाही. केवळ रश्मी ठाकरेंचे नातेवाईकच त्यांना सांभाळता आले असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

मुंबई महापालिका  निवडणुकीवरून नारायण राणे म्हणाले की, ज्यांच्याकडे अनेक वर्षापासून सत्ता आहे, त्यांनी मुंबई बकाल बनवली.  टक्केवारीनं मुंबईचं शोषण केले. विकासाच्या कामात, साफसफाईच्या कामात, नालेसफाईत टक्केवारी बोकाळली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत निश्चित परिवर्तन होईल. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल. असा विश्वास नारायण राणेंनी (Narayan rane) व्यक्त केला.