मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Road Accident : कार अपघातात भाजप आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

Road Accident : कार अपघातात भाजप आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

Dec 24, 2022, 09:56 AM IST

    • Jaykumar Gore Car Accident : पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आमदार गोरे यांच्या कारला फलटणजवळ अपघात झाला आहे. कार ५० फूट खोल खाली कोसळल्यानं गोरे यांच्यासह तीन जणांना गंभीर मार लागला आहे.
BJP MLA Jaykumar Gore Car Accident (HT)

Jaykumar Gore Car Accident : पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आमदार गोरे यांच्या कारला फलटणजवळ अपघात झाला आहे. कार ५० फूट खोल खाली कोसळल्यानं गोरे यांच्यासह तीन जणांना गंभीर मार लागला आहे.

    • Jaykumar Gore Car Accident : पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आमदार गोरे यांच्या कारला फलटणजवळ अपघात झाला आहे. कार ५० फूट खोल खाली कोसळल्यानं गोरे यांच्यासह तीन जणांना गंभीर मार लागला आहे.

BJP MLA Jaykumar Gore Car Accident : सातारा जिल्ह्यातील भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्हातील फलटणजवळील बानगंगा नदीच्या पुलावरुन ५० फूट खोल खाली आमदार गोरे यांची कार कोसळली असून त्यात गोरे यांच्यासह तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता जखमी भाजप आमदारासह इतरांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गोरे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या सहकाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मान-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे मुंबईहून आपल्या घराच्या दिशेनं येत होते. त्यावेळी ते फलटणनजीक आले असता त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यात कार रस्त्याच्या बाजूला असलेले कठडे तोडून ५० फूट खाली कोसळली. त्यात आमदार गोरे यांच्यासह तीन जण जखमी झाले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं. त्यानंतर सर्व जखमींना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील फलटणजवळील बानगंगा नदीच्या पुलावर आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्यानंतर आता जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघाग्रस्त कारला बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.