मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ShivSena vs Shinde Group : संजय राऊतांवर बोलताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली, म्हणाले...

ShivSena vs Shinde Group : संजय राऊतांवर बोलताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 24, 2022 09:00 AM IST

Shivsena vs Shinde Group : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारानं संजय राऊतांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Sanjay Gaikwad Controversial Statement
Sanjay Gaikwad Controversial Statement (HT)

Sanjay Gaikwad Controversial Statement : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेताल वक्तव्यांनंतर महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राविरोधात ठराव मंजुर झाल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री सीमावादावर काहीच बोलत नाहीत. ते शेपूट घालून बसलेत, अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर टीका केल्यानंतर आता त्यांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नावरील भूमिका स्पष्ट केली आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना त्यावर राजकीय नेत्यांनी बोलणं टाळायला हवं. परंतु जे गाढव आणि नालायक असतात ते वायफळ बडबड करत असतात, त्याची आम्ही दखल घेत नाही, असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. परंतु त्यांनीच शेपूट घातली. आता गेल्या पंधरा दिवसांत त्यांची वळवळ सुरू झाली आहे. याआधी शेपूट घालून सरेंडर केलं होतं, परंतु त्यांना आता इतकी मस्ती का आली?, असा सवाल करत गायकवाड यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेल्या उठावाची जगानं दखल घेतली. त्यावेळी आम्हाला फिरून देणार नाही, अशा धमक्या दिल्या जात होत्या. परंतु त्यावेळी आम्ही शेपूट घातलं नाही. तेव्हाही आणि आताही राज्यातील अनेक ठिकाणी वाघासारखं फिरलो. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी काय करावं, हे आम्हाला दीड शहाण्यांनी सांगण्याची गरज नाही. संजय राऊत कधीही उठतील आणि भुंकतील, त्यांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे बांधील नाहीत, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

IPL_Entry_Point