मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhavana Gawali : ‘भावनाताईंच्या सुरक्षेची जबाबदारी स्वत: मोदींनी घेतलीय, सोमय्यांनी बोललं पाहिजे'

Bhavana Gawali : ‘भावनाताईंच्या सुरक्षेची जबाबदारी स्वत: मोदींनी घेतलीय, सोमय्यांनी बोललं पाहिजे'

Aug 12, 2022, 11:58 AM IST

    • Sachin Sawant questions Kirit Somaiya: भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधल्यानंतर किरीट सोमय्या विरोधकांच्या रडारवर आले आहेत.
Modi-Gawali-Somaiya

Sachin Sawant questions Kirit Somaiya: भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधल्यानंतर किरीट सोमय्या विरोधकांच्या रडारवर आले आहेत.

    • Sachin Sawant questions Kirit Somaiya: भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधल्यानंतर किरीट सोमय्या विरोधकांच्या रडारवर आले आहेत.

Sachin Sawant questions Kirit Somaiya: रक्षाबंधनाच्या निमित्तानं काल एकनाथ शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना राखी बांधली. भावना गवळी यांच्या रक्षाबंधनाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी भाजपचे माजी खासदार व भ्रष्टाचाराविरोधात सतत पत्रकार परिषदा घेणारे किरीट सोमय्या यांना खडा सवाल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

सचिन सावंत यांनी भावना गवळी यांचा तोच फोटो शेअर करत किरीट सोमय्या यांच्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘आता भावनाताईंच्या संरक्षणाची जबाबदारी स्वत: पंतप्रधानांनी घेतली आहे. यावर किरीट सोमय्या यांची विशेष टिप्पणी अपेक्षित आहे. देणार का?,’ असं सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

<p>Sachin Sawant Tweet</p>

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड करत भाजपशी घरोबा केल्यानंतर वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी या शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. याच भावना गवळी यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वीपर्यंत ईडीचा ससेमिरा सुरू होता. एका संस्थेशी संबंधित घोटाळ्यात भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अटकही झाली होती. गवळी या शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर योगायोगानं सईद खान याला जामीन मंजूर झाला होता. गवळी यांच्या विरोधातील घोटाळ्याच्या प्रकरणात किरीट सोमय्या हे पाठपुरावा करत होते. त्यांनी गवळी यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. गवळी यांच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेकही केली होती. मात्र आता हे प्रकरण शांत झालं आहे. याच अनुषंगानं सचिन सावंत यांनी भावना गवळींच्या रक्षाबंधनाचा फोटो ट्वीट करत सोमय्यांना सणसणीत टोला हाणला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा