मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंसमोर पेच वाढला.. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नवी 'डेडलाईन'

Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंसमोर पेच वाढला.. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नवी 'डेडलाईन'

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 11, 2022 10:34 PM IST

खरी शिवसेना कुणाची तसेच धनुष्यबाण कुणाचा यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र आयोगाने शिवसेनेची मागणी अमान्य करत केवळ १५ दिवसांची मुदत दिली आहे.

उद्धव ठाकरेंसमोर पेच वाढला..
उद्धव ठाकरेंसमोर पेच वाढला..

मुंबई – गेल्या दीड महिन्यापासून शिवसेनेसमोर अडचणींमागून अडचणी येत आहेत. त्यात विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर शिवसेना आमदाराची वर्णी लागल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेला झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचा लोगो धुनष्यबाणावर सुरू असलेल्या संघर्षावर उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) गटाला चार आठवड्यांची मुदत देण्यास दिला आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला कागदपत्रांची पुर्तता करण्यास केवळ १५ दिवसांचा अवधी दिला आहे. या दिलेल्या मुदतीतच कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर शिवसेनेचे काही खासदारही शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर खरी शिवसेना आमचीच म्हणत शिंदे गटाकडून  धनुष्यबाण चिन्हावर (shivsena party symbol dispute)  दावा करण्यात आला. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची तसेच धनुष्यबाण कुणाचा यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात तसेच निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला आहे. 

याबाबत संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला  पूर्ण वेळ द्यायला नकार दिला आहे. ठाकरे गटाला उत्तरासाठी अवघ्या पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला २३ ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावे लागणार आहे. तत्पूर्वी राज्यातील सत्तासंघर्षावर २२ ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 

IPL_Entry_Point