मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pathan Film Row : भाईंदरमध्ये बजरंग दलाचा राडा; ‘पठाण’चे शो बंद पाडण्यासाठी चित्रपटगृहात तोडफोड

Pathan Film Row : भाईंदरमध्ये बजरंग दलाचा राडा; ‘पठाण’चे शो बंद पाडण्यासाठी चित्रपटगृहात तोडफोड

Jan 29, 2023, 10:56 PM IST

  • बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भाईंदरमध्ये चित्रपटगृहाबाहेर राडा करून चित्रपटाचे शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

भाईंदरमध्ये बजरंग दलाचा राडा

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भाईंदरमध्ये चित्रपटगृहाबाहेर राडा करून चित्रपटाचे शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

  • बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भाईंदरमध्ये चित्रपटगृहाबाहेर राडा करून चित्रपटाचे शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

सध्या पठाण चित्रपटावरून देशात जोरदार रणकंदन माजले असून काही हिंदूत्ववादी संघटनांनी चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली होती. आज बजरंग दलाकडून भाईंदर शहरात पठाण चित्रपटाचा शो बंड पाडण्यासाठी चित्रपटगृहात व बाहेरच्या पोस्टरची तोडफोड केली. चित्रपटगृहात झालेल्या राड्यानंतर थिएटरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणीत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली असून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Navi Mumbai: धावत्या लोकलमधून तरुणाला खाली ढकललं, सायन रुग्णालयात उपचार सुरू

मानसिक धक्क्यामुळे पीडितेला लागले सेक्सचे व्यसन, अत्याचाराचे धक्कादायक प्रकरण पाहून हायकोर्टही हादरले

Kolhapur Crime News : बायकोसोबत फोनवर बोलताना आई मध्येच बोलली, संतापलेल्या मुलाने चाकूने वार करून केली हत्या

बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी रोजी देशभरात रिलीज करण्यात आला. या चित्रपटाला चित्रपटप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने यापूर्वीच्या हिट चित्रपटांचा विक्रम या चित्रपटाने मोडत चांगली कमाई केली आहे. मात्र या चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध अजूनही कायम आहे.

बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील मॅक्सेस मॉलमध्ये सुरू असलेला चित्रपटाचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर लावलेले चित्रपटाचे पोस्टर फाडले त्याचबरोबर तिकीट खिडकीची देखील तोडफोड केली. पोलिसांना यांची माहिती मिळताच त्यांना घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा