मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात खळबळजनक घटना! एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला

Pune Crime : पुण्यात खळबळजनक घटना! एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला

Oct 03, 2022, 02:28 PM IST

    • Pune crime news : पुण्यात एका टोळक्याने दहशत माजवत एटीएम मधून पैसे काढत असलेल्या एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला. त्याची बोटे तोडून 'हम यहा के भाई है' असे म्हणून पळ काढला.
Crime News (HT_PRINT)

Pune crime news : पुण्यात एका टोळक्याने दहशत माजवत एटीएम मधून पैसे काढत असलेल्या एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला. त्याची बोटे तोडून 'हम यहा के भाई है' असे म्हणून पळ काढला.

    • Pune crime news : पुण्यात एका टोळक्याने दहशत माजवत एटीएम मधून पैसे काढत असलेल्या एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला. त्याची बोटे तोडून 'हम यहा के भाई है' असे म्हणून पळ काढला.

पुणे : पुण्यात धनकवडी परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. एका टोळक्याने कारण नसतांना एका एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी 'हम यहा के भाई है' असे म्हणत कोयते हवेत फिरवून दहशत माजवली. या घटनेमुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत. ही घटना चव्हाण नगर येथे घडली.

ट्रेंडिंग न्यूज

ICSE Result 2024 : ठाण्यातील रेहान सिंह बारावी ICSE बोर्डात भारतात पहिला, केवळ एका गुणाने हुकले १०० टक्के

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

शिवशंकर थोरात (वय २७, रा. धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. थोरात याने याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर हल्ला करुन तिघे जण पसार झाले असून हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही.

थोरात रात्री सव्वानऊच्या सुमारास चव्हाणनगरमधील निर्मल पार्क इमारतीत असलेल्या एका बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेला होता. एटीएम केंद्रातून पैसे काढून थोरात बाहेर पडला. त्या वेळी तिघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. यावेळी तिघांनी 'हम यहा के भाई है' असे म्हणत कोयते हवेत फिरवून दहशत माजवली. थोरात याच्यावर झालेल्या हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही. त्याच्यावर पूर्व वैमनस्यातून हल्ला करण्यात आल्याचा संशय सध्या पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे तपास करत आहेत.

हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या तरुणावर चाकू हल्ला

सिंबायोसीच्या मागील टेकडीवर फिरायला गेलेल्या दोन मित्रांवर एकाने चाकू हल्ला करून त्याच्या जवळील २० हजार रुपयांचा एवज लंपास केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत तरुण जखमी झाला आहे. देवांश निकेश गुप्ता (वय १९) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तो त्यांचा मित्रासोबत हनुमान टेकडीवर फिरायला गेला होता. यावेळी दोघे त्यांच्या जवळ आले. त्यांनी चाकूचा दाखवून देवांश वर वार केले. यात तो जखमी झाला. आरोपींनी त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून पोबारा केला.

बस मधून प्रवास करत असतांना महिलेच्या गळ्यातील मंगसुत्र लांबविले

पुण्यातील सहकार नगर येथे एका बस मधून एक महिला प्रवास करत असताना तिच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पना सोनार (वय ५५) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्या बस मधून प्रवास करत असताना एका आरोपीने बस मधील गर्दीचा फायदा घेत, त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले. ही बाब बस मधून खाली उतरल्यावर त्याच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा