मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुरंदर तालुक्यातील काळभैरव जोगेश्वरी मंदिरावर दरोडा; ५ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Pune Crime : पुरंदर तालुक्यातील काळभैरव जोगेश्वरी मंदिरावर दरोडा; ५ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Sep 29, 2022, 01:02 PM IST

    • Theft at Somurdi Temple in Purandar : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सोमुर्डी येथे असेलेल्या पुरातन ग्रामदैवत काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीच्या मंदिरावर पहाटेच्या सुमारास दरोडा टाकून मंदिरातील पारंपरिक दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
Crime News (HT_PRINT)

Theft at Somurdi Temple in Purandar : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सोमुर्डी येथे असेलेल्या पुरातन ग्रामदैवत काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीच्या मंदिरावर पहाटेच्या सुमारास दरोडा टाकून मंदिरातील पारंपरिक दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

    • Theft at Somurdi Temple in Purandar : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सोमुर्डी येथे असेलेल्या पुरातन ग्रामदैवत काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीच्या मंदिरावर पहाटेच्या सुमारास दरोडा टाकून मंदिरातील पारंपरिक दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे : जिल्ह्यात सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेक मंदिरात कार्यक्रम सुरू आहे. उत्सवमूर्तीला पारंपरिक दागिने घालण्यात आले आहे. अशाच पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी येथे ग्रामदैवत काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीच्या मंदिरातील पहाटेच्या सुमारास दरोडा टाकून ५ लाख रुपयांचे दागिने लंपास केले. मंदिरातील पारंपरिक दागिने चोरीला गेल्यामुळे खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

या प्रकरणी शोक भिवा पन्हाळकर (वय ५३) यांनी सासवड पोलिसांत तक्रार दिली आहे. सोमुर्डी येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीचे पुरातन मंदिर आहे. ग्रामस्थांनी देवीला अनेक पारंपरिक दागिने दिले आहेत. हे दागिने दरवर्षी नवरात्र उत्सवात देवाला घातले जातात. याही वर्षी नव रात्री निमित्त दागिने देवाला घालण्यात आले होते. तब्बल ५ लाख रुपयांचे दागिने देवीच्या अंगावर होते. बुधवारी पहाटेच्यावेळी हे मंदिरातील पुजारी देवीला अभिषेक घालून मंदिर बंद करून परत गेले होते. ते ९ च्या सुमारास मंदिरात परत आल्यावर त्यांना मंदिराचा दारवजा तुटलेला दिसला. तसेच देवीच्या अंगावर दागिने दिसले नाही. त्यांनी ही बाब गावातील नागरिकांना दिली. त्यांनी नंतर पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. दरोडेखोरांनी देवाचे मुकुट देवाचा अश्व, पादुका आणि काळभैरवनाथ जोगेश्वरीची चांदीची मूर्ती आणि दागिने चोरून नेले आहे.

पुजारी पन्हाळकर म्हणाले, आम्ही सणावारासाठी फक्त दागिने आणि या मूर्ती बाहेर काढतो. त्या माझ्या ताब्यात घरी असतात. मंदिरात फक्त दगडी मूर्ती असते. देवाला साधारण १० तोळ्याचे सोन्याचे दागिने आहेत. ते दागिने आम्ही फक्त यात्रेमध्ये आणि नवरात्रीमध्ये देवाला घालतो. देवीचे दागिने सरपंच यांच्या ताब्यात असतात. सोमवारी घटस्थापने दिवशी आम्ही देवाला सोन्याचे दागिने घातलेले होते. तसेच चांदीचा अश्व, पादुका व जोगेश्वरी भैरवनाथ चांदीची मूर्ती सुद्धा पूजेसाठी पायथ्याला ठेवली होती. बुधवार सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मुर्ती वरील किंमत ५,००,००० रुपयांचा एवज चोरून नेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के व पोलीस नाईक सुहास लाटणे हे करीत आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या