मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : नराधम बापच निघाला गुन्हेगार; सात वर्षांच्या बालिकेला फेकले नदीत

Pune Crime : नराधम बापच निघाला गुन्हेगार; सात वर्षांच्या बालिकेला फेकले नदीत

Sep 29, 2022, 10:44 AM IST

    • Pune Crime News : पुण्यात शिरूर तालुक्यातील बजरंगवाडी येथे एका बापाने त्याची मुलगी ही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, या बापानेच आपल्या मुलीचा खून केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
Crime News (HT_PRINT)

Pune Crime News : पुण्यात शिरूर तालुक्यातील बजरंगवाडी येथे एका बापाने त्याची मुलगी ही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, या बापानेच आपल्या मुलीचा खून केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

    • Pune Crime News : पुण्यात शिरूर तालुक्यातील बजरंगवाडी येथे एका बापाने त्याची मुलगी ही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, या बापानेच आपल्या मुलीचा खून केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

पुणे : पुण्यात शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे एका बापाने त्यांची सात वर्षांची मुलगी ही बेपत्ता झाली होती. या बाबत पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहितीपुढे आली आहे. मुलीच्या वडिलांनीच खून केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

बजरंगवाडी येथून अपेक्षा युवराज सोळुंके (वय ७) ही बालिका मंगळवारी रात्री बेपत्ता झाली होती. मुलीच्या वाडिलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पथकची स्थापना करून शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ती सापडली नाही. त्यानंतर या घटनेचा तपास करत असताना अनेक ठिकाणी सीसीटिव्ही तपासले असता मुलीच्या वडिलांनी मुलीला नदीच्या कडेला नेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. यात त्यांनीच मुलीला ठार मारल्याची कबुली दिली.

मुलीला वेळ नदीच्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेळ नदीपात्रात धाव घेत पाहणी केले असता मुलीच्या चपला मिळून आल्या. मुलीच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मुलीचे वडील युवराज सोळुंके यास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या