मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambernath Murder: पत्नीला मुलबाळ होत नसल्याने पतीने उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात अवजड वस्तू मारून केला खून

Ambernath Murder: पत्नीला मुलबाळ होत नसल्याने पतीने उचललं टोकाचं पाऊल, डोक्यात अवजड वस्तू मारून केला खून

May 29, 2023, 01:03 PM IST

    • Ambernath Murder: अंबरनाथ येथे एका पतीने आपल्या पत्नीला मुलबाळ होत नसल्याने तिच्या डोक्यात कठीण वस्तूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Ambernath Murder

Ambernath Murder: अंबरनाथ येथे एका पतीने आपल्या पत्नीला मुलबाळ होत नसल्याने तिच्या डोक्यात कठीण वस्तूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    • Ambernath Murder: अंबरनाथ येथे एका पतीने आपल्या पत्नीला मुलबाळ होत नसल्याने तिच्या डोक्यात कठीण वस्तूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अंबरनाथ : लग्नाला १२ वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्याने एका पत्नीने आपल्या पत्नीच्या डोक्यात कठीण वस्तूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ येथे उघडकीस आली आहे. ही घटना येथील ऑर्डनन्स इस्टेटमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करण्याऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

ISRO NavIC : चीन, पाकिस्तानवर आता अंतराळातून राहणार नजर; इस्रोनं केलं 'नाविक' उपग्रहाच यशस्वी प्रक्षेपण

रोनीतराज मंडल (वय ३७) असं आरोपी पतीचे नाव आहे. नीतू कुमारी मंडल (वय ३०) असे खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. हे दाम्पत्य मूळचे बिहारमधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचं २०११ साली लग्न झालं होतं. रोनीतराज हा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अंबरनाथमधील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर म्हणून काम करत असून तो ऑर्डनन्स इस्टेटमधील एच ३८ या स्टाफ क्वार्टरमध्ये पत्नीसह राहत होता. दोघांच्याही लग्नाला १२ वर्ष झाली होती. मात्र, त्यांना मुलबाळ नव्हते. वरून दोघांमध्ये वाद होत होते.

Road Accident : गुवाहाटी येथे भीषण अपघात ७ इंजिनियर विद्यार्थी जागीच ठार; ६ जण जखमी

दरम्यान, नीतू ही आयव्हीएफ ट्रीटमेंटही घेत होती. दरम्यान, रोनीतराज हा नितूच्या चारित्र्यावरून संशय घ्यायचा. यावरून रविवारी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्याने घरातील काही तरी कठीण वस्तूने तिच्या डोक्यावर प्रहार करून तिचा खून केला.

 

एवढेच नाही तर तिच्या खुनाचा बनाव देखील त्याने रचला. त्याने बोलावत पत्नीची कुणीतरी हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. यात रोनीतराज याची चौकशी केली. मात्र, त्याने दिलेल्या उत्तरावरून पोलिसांचा संशय बळावला. त्याला पॉलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच नितूला मुलबाळ होत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने सांगिले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा