मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gautam Adani meets Sharad Pawar : गौतम अदानी शरद पवारांना भेटले!; बंद दाराआड दोन तास चर्चा

Gautam Adani meets Sharad Pawar : गौतम अदानी शरद पवारांना भेटले!; बंद दाराआड दोन तास चर्चा

Apr 20, 2023, 01:55 PM IST

  • Gautam Adani meets Sharad Pawar : सध्या संकटात असलेल्या अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

Gautam Adani

Gautam Adani meets Sharad Pawar : सध्या संकटात असलेल्या अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

  • Gautam Adani meets Sharad Pawar : सध्या संकटात असलेल्या अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

Gautam Adani meets Sharad Pawar : हिंडनबर्ग अहवालातून अदानी समूहावर झालेले फसवुणकीचे व अफरातफरीचे आरोप, अदानी समूहाच्या चौकशीची विरोधकांकडून होत असलेली मागणी आणि काँग्रेसनं देशभरात या मुद्द्यावर काहूर उठवलेलं असतानाच गौतम अदानी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल दोन तास चर्चा झाल्याचं समजतं.

ट्रेंडिंग न्यूज

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Pune Lohegaon News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट झाली. पवार व अदानी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, राजकीय व उद्योग वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Rahul Gandhi: देशाची सर्व संपत्ती एकाच माणसाला का देताय?; अदानींच्या प्रगतीचा आलेख दाखवत राहुल गांधींचा मोदींना सवाल

अदानी समूहावर चौफेर हल्ले होत असताना काही दिवसांपूर्वी शरद पवार त्यांच्या मदतीला धावले होते. अदानी यांच्या जेपीसी चौकशीची गरज नाही. त्याऐवजी न्यायालयीन चौकशी करावी. एखाद्या विदेशी संस्थेच्या आरोपांच्या आधारे आपण आपल्या उद्योगपतीला लक्ष्य करू नये, असं पवार म्हणाले होते. त्यावरून सोशल मीडियात शरद पवारांवर जोरदार टीका झाली होती. शरद पवार हे अदानींना पाठिशी घालून या मुद्द्यावर अडचणीत आलेल्या मोदी सरकारला मदत करत असल्याचा आरोप झाला होता. काँग्रेसच्या काही नेत्यांनी उघडपणे यावर भाष्य केलं होतं. शरद पवार यांनी अदानींच्या मालकीच्या टीव्हीला मुलाखत देऊनच हे भाष्य का केलं, असाही प्रश्न उपस्थित झाला होता.

राजकीय वर्तुळातून झालेल्या टीकेनंतर शरद पवार यांनी घूमजाव करत अदानी यांच्या जेपीसी चौकशीला आपला विरोध नसल्याचं म्हटलं होतं. जेपीसी चौकशीपेक्षा न्यायालयीन चौकशी अधिक प्रभावी ठरेल, एवढंच मला म्हणायचं आहे, असंही ते म्हणाले होते. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं असतानाच आता अदानी व पवार भेट झाल्यानं पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा