मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi: देशाची सर्व संपत्ती एकाच माणसाला का देताय?; अदानींच्या प्रगतीचा आलेख दाखवत राहुल गांधींचा मोदींना सवाल

Rahul Gandhi: देशाची सर्व संपत्ती एकाच माणसाला का देताय?; अदानींच्या प्रगतीचा आलेख दाखवत राहुल गांधींचा मोदींना सवाल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 20, 2023 11:47 AM IST

Rahul Gandhi questions PM Modi on Adani Group Growth : २०१४ नंतर अदानी समूहानं अचानक केलेल्या प्रगतीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा घेरलं आहे.

Narendra Modi - Rahul Gandhi
Narendra Modi - Rahul Gandhi

Rahul Gandhi questions PM Narendra Modi : हिंडनबर्गच्या अहवालानंतर संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अदानी समूहाच्या कारभारावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. अदानी समूहावर झालेल्या आरोपांची संयुक्त संसदीय समितीमार्फत (JPC) चौकशी व्हावी, ही मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. दुसरीकडं राहुल यांनी अदानी व मोदी यांच्या कथित युतीवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.

राहुल गांधी यांनी आज एक व्हिडिओ ट्वीट करत अदानी समूहाच्या वेगवान प्रगतीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी यांनी अदानी यांच्या उद्योगाच्या प्रगतीचा आलेख दाखवत मोदी यांना लक्ष्य केलं आहे. त्यांनी २०१४ आधी अदानी यांच्या उद्योग-व्यवसायाची स्थिती काय होती आणि २०१४ नंतर त्यात कशी वाढ झाली याचा आलेखच दाखवला आहे.

Karnataka polls 2023 : कर्नाटकात पवारांची ‘पॉवर’.. भाजपचे चार ते पाच आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सबका साथ, सबका विकास असा नारा देतात, मात्र प्रत्यक्षात सध्याचं केंद्र सरकार केवळ एकाच माणसाच्या मागे उभं आहे. त्याच व्यक्तीचा विकास केला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. २०१४ च्या आधी अदानी हे जगातील श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या स्थानी होते, ते अचानक दुसऱ्या क्रमांकावर आले, याकडं राहुल गांधी यांनी लक्ष वेधलं आहे.

अदानी याचा उद्योग झपाट्यानं वाढत आहे. उद्योग-व्यवसायाची प्रगती होणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. उद्योग वाढलाच पाहिजे. पण इथं उद्योग केवळ वाढलेला नाही, इथं जादू झाली आहे. इलेक्ट्रिकल, सोलर, विंड पावर, मायनिंग, डिफेन्स, रोड्स, एअरपोर्ट्स, पोर्ट्स, ऊर्जा, कोळसा, सिमेंट, गॅस वितरण… सर्व ठिकाणी अदानी, अदानी, अदानी हेच नाव आहे. भारतातील सर्व संपत्ती, सर्व धन एकाच व्यक्तीला का दिलं जात आहे? यामागे कोणती शक्ती आहे? हे तुमच्याकडून कोण करवून घेतोय? देशाचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक तरुण आज हा एकच प्रश्न विचारतोय, किमान उत्तर तरी द्या,' असं आवाहन राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना केलं आहे.

IPL_Entry_Point