मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Assembly Election : काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर.. सचिन पायलट यांना वगळलं, तर शेट्टर यांना निवडलं

Karnataka Assembly Election : काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर.. सचिन पायलट यांना वगळलं, तर शेट्टर यांना निवडलं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 19, 2023 08:27 PM IST

Sachin Pilot missing from Cong's list of campaigners : काँग्रेसकडून जाहीर केलेल्यास्टार प्रचारकांच्या यादीतएका बड्या नेत्याचे नाव समाविष्ट न केल्याने तर दुसऱ्या एका नेत्याला यादीत स्थान दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आले आहे.

Sachin Pilot
Sachin Pilot

Karnataka Assembly Election २०२३ : कर्नाटकमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून अनेक नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून जाहीर केलेल्यास्टार प्रचारकांच्या यादीत एका बड्या नेत्याचे नाव समाविष्ट न केल्याने तर दुसऱ्या एका नेत्याला यादीत स्थान दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आले आहे. या यादीत एक नाव समाविष्ट नाही तर दुसऱ्या नावाचा या यादीत समावेश नाही.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपने तिकीट कापल्यामुळे नुकतेच भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव या यादीत आहे. दुसरीकडे काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांचे नाव या यादीतन सल्याने पायलट-गेहलोत संघर्ष पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे. राजस्थानमध्ये पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील मतभेदामुळेच पायलट यांचे नाव यादीत नसल्याचे बोलले जात आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व्यतिरिक्त, इतर काँग्रेस मुख्यमंत्र्यांमध्ये भूपेश बघेल (छत्तीसगड) आणि सुखविंदर सिंग सुखू (हिमाचल प्रदेश) यांचा पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

कर्नाटकात १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जगदीश शेट्टर यांना तिकीट नाकारले. त्यानंतर त्यांनी भाजपशी संबंध तोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेट्टर अनेक दशके जनसंघ आणि भाजपचा भाग होते.

IPL_Entry_Point

विभाग