मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ahmednagar : विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, अहमदनगर येथील घटना

Ahmednagar : विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, अहमदनगर येथील घटना

Apr 10, 2024, 01:32 PM IST

  • 5 of Ahmednagar family die in well: अहमदनगर येथील नेवासा तालुक्यात विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगरमध्ये मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

5 of Ahmednagar family die in well: अहमदनगर येथील नेवासा तालुक्यात विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 5 of Ahmednagar family die in well: अहमदनगर येथील नेवासा तालुक्यात विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Ahmednagar News: अहमदनगर येथील नेवासा तालुक्यातील वाकडी परिसरात मंगळवारी (९ एप्रिल २०२४) धक्कादायक घटना घडली. पडक्या विहिरीत पडलेल्या एका मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकाला वाचवण्यात पोलिसांना यश आले. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर; लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक आलं समोर

SSC, HSC 2024 Result: इयत्ता दहावी, बारावीचा निकाल आज जाहीर होणार नाहीत, महाराष्ट्र बोर्डाकडून स्पष्ट!

Narendra Dabholkar Murder Case: आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर निर्दोष का सुटले?

Narendra Dabholkar case: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत मांजर अडकल्याचे संबंधित कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी मांजरीला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. मांजरीला वाचवण्यासाठी एकामागोमाग एक कुटुंबातील सहा सदस्यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. यातील एका जणाने मदतीसाठी हाक मारली, त्यावेळी विहिरीच्या बाजूने जात असलेल्या गावकऱ्याने ऐकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर काही वेळातच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबातील एका सदस्याला वाचवण्यात आले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, ५ जणांचा मृत्यू झाला.

Mumbai News : गुढीपाडव्यादिवशी दुर्दैवी घटना, विरारमध्ये सेफ्टी टँकमध्ये बुडून चार मजुरांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ

माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब गायकवाड अशी मृतांची नावे आहेत. बचाव पथकांना सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून सर्वांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. 

Pune murder : खळबळजनक! पुण्यात पैशासाठी मुलीने मित्राच्या मदतीने केला आईचा खून; घरात पडून मृत्यूचा रचला बनाव

एकाला वाचवण्यात पोलिसांना यश

अहमदनगरच्या नेवासा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी धनंजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एका मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना एका पडक्या विहिरीत एकापाठोपाठ उडी मारलेल्या कुटुंबातील सहापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. कमरेला दोरी बांधून विहिरीत शिरलेला एक जण वाचला असून त्याच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

विरार: सांडपाण्याची टाकी साफ करताना ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू

विरार येथील एका रहिवाशी सोसायटीत सांडपाण्याची टाकी साफ करताना ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. विरार पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २० वयोगटातील चार मजूर सकाळी ११.३० च्या सुमारास प्लांटमध्ये साफसफाई करण्यासाठी घुसले, परंतु ते बाहेर न आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा