Pune murder : खळबळजनक! पुण्यात पैशासाठी मुलीने मित्राच्या मदतीने केला आईचा खून; घरात पडून मृत्यूचा रचला बनाव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune murder : खळबळजनक! पुण्यात पैशासाठी मुलीने मित्राच्या मदतीने केला आईचा खून; घरात पडून मृत्यूचा रचला बनाव

Pune murder : खळबळजनक! पुण्यात पैशासाठी मुलीने मित्राच्या मदतीने केला आईचा खून; घरात पडून मृत्यूचा रचला बनाव

Updated Apr 09, 2024 08:59 AM IST

Pune Vadgaon Sheri mother murder : पुण्यात एका मुलीने पैशांसाठी आपल्या आईचा मित्राच्या मदतीने खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या नंतर मुलीने आईच्या मृत्यूचा बनाव देखील रचला.

पुण्यात पैशासाठी मुलीने मित्राच्या सोबतीने केला आईचा खून; घरात पडून मृत्यूचा रचला बनाव
पुण्यात पैशासाठी मुलीने मित्राच्या सोबतीने केला आईचा खून; घरात पडून मृत्यूचा रचला बनाव

Pune Vadgaon Sheri mother mother : पुण्यात पैशांसाठी मित्रांनीच मैत्रिणीचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वडगाव शेरी येथे पैशांसाठी मुलीने तिच्या मित्रासोबत आईच्या डोक्यात हातोडा मारून आणि उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना आज सकाळी उघकडीस आली. या नंतर घसरून पडल्याने आईचा मृत्यू झालाच बनाव मुलीने रचला. मात्र, नातेवाईकांनी संशय व्यक्त करून पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिल्यावर या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात मुलीवर व तिच्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gudi Padwa 2024 : गुडी पाडवा शोभा यात्रा, पाडवा मेळाव्यामुळे मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल; अशी असेल वाहतूक, वाचा!

मंगल संजय गोखले (वय ४५, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. तर यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (वय १८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

या घटनेचे वृत्त असे की, योशिता ही मंगल गोखले यांची मुलगी असून तिचे काही दिवसांपूर्वी टीच्या मित्राच्या मदतीने मंगल यांच्या बँक खात्यामधून त्यांना न सांगता परस्पर पैसे काढले. दरम्यान, हा प्रकार आईला कळला तर ती रागवेल या भीतीने तिने थेट आईच्या खुनाचा कट रचला. या साठी तिने तिचा मित्र यश शीतोळे याला घरी बोलावत त्याला घरातील हातोडा दिला.

Solar Eclipse 2024 : जगभरात असे दिसले सूर्यग्रहण: दुर्मिळ खगोलीय घटनेचे पाहा काही खास फोटो

दरम्यान, मंगल या घरात त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या. यावेळी झोपलेल्या मंगल यांनी आवज करू नये या साठी योशिताने मंगल यांचे तोंड स्कार्फने दाबले. तर याच वेळी यशने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने मारून त्यांचा खून केला. दरम्यान, या गुन्हाचा सापडू नये यासाठी त्यांनी आई मंगल या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचा बनाव रचला. तसेच मंगल यांचा मृत्यू झाल्याची माहिती तिने नातेवाईकांना दिली. मात्र, मुलीच्या बोलण्यावरून मंगल यांच्या बोलण्याबाबत नातेवाईकांना शंका आली. त्यांनी घेत या बाबत चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यानंतर हा मृत्यू नसून खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या बाबत मुलीला विचारले असता तिने आधी उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसांनी हिसका दाखवताच तिनेच मित्राच्या साह्याने खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, तिला कारण विचारले असता तिने आईच्या खत्यातून परस्पर पैसे काढल्याने आई रागवेल या भीतीने तिचा खून करून मृत्यूचा बनाव रचल्याचे सांगितले. या घटनेमुळे वडगाव शेरी परिसरात खळबळ उडाली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर