मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai News : गुढीपाडव्यादिवशी दुर्दैवी घटना, विरारमध्ये सेफ्टी टँकमध्ये बुडून चार मजुरांचा मृत्यू

Mumbai News : गुढीपाडव्यादिवशी दुर्दैवी घटना, विरारमध्ये सेफ्टी टँकमध्ये बुडून चार मजुरांचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 09, 2024 05:23 PM IST

Mumbai News : विरारमध्ये सेफ्टी टँक साफ करताना चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सेफ्टी टँक साफ करताना चार मजुरांचा मृत्यू
सेफ्टी टँक साफ करताना चार मजुरांचा मृत्यू

संपूर्ण राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह असताना तसेच रांगोळ्या, भव्य शोभायात्रांनी जल्लोषी वातावरण असताना विरारमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे एका सेफ्टी टँकमध्ये बुडून चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

विरार पश्चिम येथील रुस्तुमजी शाळेच्या बाजूला असणाऱ्या सेफ्टी टँकची सफाई केली जात होती. यावेळी ४ मजुरांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ चारही कर्मचाऱ्यांचा पाण्यात उतरल्याने मृत्यू झाला आहे. 

या घटनेत शुभम पारकर (वय २८), अमोल घाटाळ (वय २७), निखिल घाटाळ (वय २४)  आणि  सागर तेंडुलकर (वय २९) अशी मृतांची नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम येथील एसटीपी प्लांटमध्ये चोकअप झाले होते. याचे दुरुस्तीचे काम सुरू होते. याची  दुरस्ती करण्यासाठी एक कर्मचारी पाण्यात उतरला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो परत आला नसल्याने त्याला शोधण्यासाठी दुसरा कर्मचारी गेला. त्यालाही जाऊन खूप वेळ झाला मात्र तोही परत न आल्याने तिसरा कर्मचारी गेला. तिघेही परत न आल्याने चौथा मजूर त्यांना शोधण्यासाठी सेफ्टी टँकमध्ये गेला. अशा प्रकारे चारही मजुरांचा एसटीपी प्लांटमध्ये गुदमरून मृत्यू झाला

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ दुर्घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचारी ब्रीदिंग ऑपरेटर सेट परिधान करून पाण्यात उतरले असताना त्यामध्ये चारही मजूर मरून पडल्याचे दिसले. त्यांनी सर्व मृतांना बाहेर काढले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. चारही कर्मचाऱ्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आले नाही.

पुण्यात पैशासाठी मुलीने मित्राच्या मदतीने केला आईचा खून –

 वडगाव शेरी येथे पैशांसाठी मुलीने तिच्या मित्रासोबत आईच्या डोक्यात हातोडा मारून आणि उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना आज सकाळी उघकडीस आली. या नंतर घसरून पडल्याने आईचा मृत्यू झालाच बनाव मुलीने रचला. मात्र, नातेवाईकांनी संशय व्यक्त करून पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिल्यावर या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात मुलीवर व तिच्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग