मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Priya berde: प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीला रामराम! फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Priya berde: प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीला रामराम! फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Feb 11, 2023, 06:22 PM IST

  • Priya berde joined bjp : प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आज नाशिकमध्ये भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Priya berde joined bjp : प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आज नाशिकमध्ये भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

  • Priya berde joined bjp : प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आज नाशिकमध्ये भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

दोन वर्षापूर्वी म्हणजे २०२० मध्ये प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत राजकारणास सुरुवात केली होती. त्याच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाच्या काळात मराठी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींना मदत केली होती. मात्र दोन वर्षातच प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे कारण समोर आलेले नाही. 

प्रिया बेर्डे यांनी ७ जुलै २०२० रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता त्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे. प्रिया बेर्डे यांनी अनेक मराठी व हिंदी  चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.