मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kothrud Crime News : पुण्यातील कोथरुडमध्ये थरार, युवकावर कोयत्यानं हल्ला; नागरिकांमध्ये घबराट

Kothrud Crime News : पुण्यातील कोथरुडमध्ये थरार, युवकावर कोयत्यानं हल्ला; नागरिकांमध्ये घबराट

Dec 05, 2022, 03:19 PM IST

    • Kothrud Crime News : तरुण आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला होता. त्यावेळी टोळक्यानं त्याला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Kothrud Pune Crime News Marathi (HT_PRINT)

Kothrud Crime News : तरुण आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला होता. त्यावेळी टोळक्यानं त्याला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Kothrud Crime News : तरुण आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला होता. त्यावेळी टोळक्यानं त्याला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kothrud Pune Crime News Marathi : किरकोळ वादातून पुणे शहरातील कोथरुडमध्ये एका युवकावर कोयत्यानं वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं परिसरात खळबळ उडाली असून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यानं कोथरुडमधील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, यश कालीदास जगताप नावाचा तरुण साईनाथ वसाहतीत मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेला होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचे सचिन शंकर कदम आणि प्रवीण शंकर कदम नावाचे दोन तरुण तिथं आले. थोडा वेळ त्यांच्या चर्चा झाल्यानंतर अचानक वादावादीला सुरुवात झाली. सुरुवाताली यशच्या मित्रांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आणि आरोपींमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर प्रकरण हाताबाहेर गेलं. त्यानंतर प्रवीण आणि सचिन यांनी यशवर कोयत्यानं वार करत त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यशनं आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

या हल्ल्याची माहिती समजताच परिसरातील अनेक लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच कोथरूड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर उपस्थितांनी जखमी यशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून पोलिसांनी सचिन आणि प्रवीण या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फडतरे करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा