मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Murder : खळबळजनक! पिंपरीत पिस्तुलातून गोळ्या झाडत कोयत्याने केले वार; भर चौकात एकाचा खून

Pune Murder : खळबळजनक! पिंपरीत पिस्तुलातून गोळ्या झाडत कोयत्याने केले वार; भर चौकात एकाचा खून

Dec 03, 2022, 05:44 PM IST

    • Pune Pimpri Murder : पुण्याची आर्थिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. येथील भर चौकात एका टोळक्याने एका अल्पवयीन तरुणावर आधी गोळीबार करत आणि नंतर त्याच्यावर कोयत्याने वार करत त्याची हत्या केली आहे.
पुणे क्राइम

Pune Pimpri Murder : पुण्याची आर्थिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. येथील भर चौकात एका टोळक्याने एका अल्पवयीन तरुणावर आधी गोळीबार करत आणि नंतर त्याच्यावर कोयत्याने वार करत त्याची हत्या केली आहे.

    • Pune Pimpri Murder : पुण्याची आर्थिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. येथील भर चौकात एका टोळक्याने एका अल्पवयीन तरुणावर आधी गोळीबार करत आणि नंतर त्याच्यावर कोयत्याने वार करत त्याची हत्या केली आहे.

पुणे : पुण्याची आर्थिक आणि उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरीचिंचवड मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शुक्रवारी रात्री एका टोळक्याने एका अल्पवयीन गुन्हेगारावर गोळीबार करत त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Onion Export: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ९९,१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Mumbai-Pune Expressway Bus Fire: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Karoli Ghat Bus Accident: इंदूरहून अकोल्याकडे येणारी खासगी बस दरीत कोसळली; २८ प्रवासी जखमी

Mumbai Water Cut : तारीख लक्षात ठेवा! मुंबईतील बोरिवली, कांदिवली परिसरात ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जणांच्या टोळक्याने अचानक येऊन विशाल गायकवाड या गुन्हेगारावर आधी गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात विशाल गायकवाड याचा जागेवरच मृत्यू झाला. खून झालेला विशाल हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल होते. वॉशिंग सेंटरच्या वादातून त्याचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विशाल गायकवाड हा परशुराम चौकात खुर्चीवर बसला होता. यावेळी १३ जणांच्या टोळक्याने येऊन पिस्तूलातून तीन गोळ्या झाडल्या. यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करूनत्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याची दखल घेऊन सहा जणांना अटक केली आहे.

विशालचा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता. दादा कांबळे याची ह्या व्यवसायात भागीदारी होती. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. दादा कांबळे हा विशाल लष्करे सोबत असायचा. दोघे ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून यातूनच त्यांनी विशाल गायकवाडची हत्या केल्याचे बोलले जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा