मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: बेली फॅट असो वा मनःशांती, प्राणायामचे आहेत अनेक फायदे

Yoga Mantra: बेली फॅट असो वा मनःशांती, प्राणायामचे आहेत अनेक फायदे

Jan 11, 2023, 08:22 AM IST

    • हेल्दी राहण्यासाठी जिम आणि फॅन्सी मशीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तर साध्या योग प्राणायाममुळे तुमच्या अनेक समस्या सोडवता येतात.
भ्रामरी

हेल्दी राहण्यासाठी जिम आणि फॅन्सी मशीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तर साध्या योग प्राणायाममुळे तुमच्या अनेक समस्या सोडवता येतात.

    • हेल्दी राहण्यासाठी जिम आणि फॅन्सी मशीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तर साध्या योग प्राणायाममुळे तुमच्या अनेक समस्या सोडवता येतात.

Benefits of Pranayama: योग आणि प्राणायामाचे फायदे आपण खूप दिवसांपासून ऐकत आहोत आणि वाचत आहोत. संस्कृतमध्ये प्राण म्हणजे लाइफ एनर्जी किंवा जीवन, याम म्हणजे नियंत्रण करणे. प्राणायाम हा योगाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हा एक प्रकारचा श्वासोच्छवासाचा व्यायाम आहे. यामध्ये तुम्हाला एका विशिष्ट क्रमाने श्वास घ्यावा लागतो आणि सोडावा लागतो. योगामध्ये आपण प्राणायामाला इतर अनेक आसनांशी जोडतो. असे मानले जाते की प्राणायामाद्वारे आपण मनाला आपल्या शरीराशी जोडतो. चला जाणून घेऊया प्राणायामचे काही फायदे.

ट्रेंडिंग न्यूज

Mother's Day Special: मदर्स डे ला आईसोबत एक्सप्लोर करा ही ठिकाणं, संस्मरणीय होईल दिवस

Mother's Day Recipe: आईसाठी बनवा टेस्टी रव्याचे पॉकेट्स, झटपट तयार होते ही रेसिपी

Menopause Journey: रजोनिवृत्तीचा करा एकत्र स्वीकार, जाणून घ्या या नव्या पर्वातून कपलने कसा काढावा मार्ग

Cake Baking Tips: घरी बनवलेला केक खराब होतो का? परफेक्ट बेकिंगसाठी फॉलो करा या टिप्स

नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देणार नाहीत

धकाधकीच्या जीवनात हल्ली प्रत्येक जण स्ट्रेस, टेन्शन याने त्रस्त आहे. अधिक ताणामुळे कधी कधी मन नकारात्मक विचारांकडे अधिक झुकतो. एका संशोधनानुसार प्राणायाम तुम्हाला आराम देतो. यासोबतच मनावर नियंत्रण ठेवायलाही शिकवते. ज्याला माइंडफुलनेस म्हणतात. यामुळे तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार तुम्हाला त्रास देत नाहीत.

फुफ्फुसासाठीही लाभदायक

प्राणायामच्या फायद्यांबाबत बरेच संशोधन झाले आहे. २०१३ च्या अभ्यासानुसार, प्राणायाममुळे तणावाची पातळी कमी होते. संशोधनात असे दिसून आले आहे की प्राणायाम मज्जासंस्थेला शांत करतो, ज्यामुळे तणावाची प्रतिक्रिया सुधारते. क्लिनिकल अभ्यासानुसार ५ मिनिटे भ्रामरी प्राणायाम केल्याने हार्ट रेट कमी होते आणि श्वासोच्छवासाचा त्रासही दूर होतो. यामुळे झोपही चांगली लागते. २०१९ च्या एका संशोधनानुसार, तुम्ही ६ आठवडे १ तास प्राणायाम केल्यास तुमच्या फुफ्फुसांना खूप फायदा होतो. दमा, एलर्जीक ब्राँकायटिस, न्यूमोनिया आणि क्षयरोगात हे फायदेशीर आहे.

कपालभातीने कमी होईल पोटाची चरबी

कपालभाती हा असा योग प्राणायाम आहे ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी देखील कमी होते. कपालभातीचा शरीरातील चयापचय दर आणि पचनक्रियेशी थेट संबंध आहे. जर तुम्ही हा प्राणायाम नीट केला तर आठवडाभरात तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतील. कपालभातीमुळे तुमचे रक्ताभिसरणही ठीक होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग