मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: फर्टिलिटीच्या समस्येत दोघांनी करावे हे योगासन, कंसीव्ह करण्यात येणार नाही अडचण

Yoga Mantra: फर्टिलिटीच्या समस्येत दोघांनी करावे हे योगासन, कंसीव्ह करण्यात येणार नाही अडचण

Jan 07, 2023, 08:42 AM IST

    • Yoga Poses: खाण्या-पिण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली आणि इतर काही सवयींमुळे आजकाल स्त्रिया आणि पुरुष दोघेही प्रजनन क्षमतेच्या समस्येला सामोरे जात आहेत. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी योगाची मदत घ्या.
कपल योगासन

Yoga Poses: खाण्या-पिण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली आणि इतर काही सवयींमुळे आजकाल स्त्रिया आणि पुरुष दोघेही प्रजनन क्षमतेच्या समस्येला सामोरे जात आहेत. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी योगाची मदत घ्या.

    • Yoga Poses: खाण्या-पिण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली आणि इतर काही सवयींमुळे आजकाल स्त्रिया आणि पुरुष दोघेही प्रजनन क्षमतेच्या समस्येला सामोरे जात आहेत. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी योगाची मदत घ्या.

Yoga Asana that Boost Fertility: आजकाल कपल्सला लग्नानंतर मूल होण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातील सर्वात प्रमुख म्हणजे फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमतेची समस्या. होय, बहुतेक महिला आणि पुरुषांना प्रजनन क्षमतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. यापासून मुक्त होण्यासाठी योगासने सहज मदत करू शकतात. योग तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी फायदेशीर आहे. अशा वेळी तुम्ही ते दररोज केले पाहिजे. वंध्यत्व पुरुष आणि स्त्रियांच्या शरीरावर, भावनांवर आणि नातेसंबंधांवर परिणाम करते. अशा परिस्थितीत योगा करणे स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर आहे. येथे काही योगासने आणि त्यांचे फायदे आहेत, ज्यामुळे प्रजनन क्षमता सुधारू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी योगाचे फायदे

- अंडाशय आणि गर्भाशयाला उत्तेजित करते.

- तणाव आणि चिंता कमी करते.

- हार्मोन लेव्हल संतुलित करते.

- रक्त प्रवाह आणि रक्ताभिसरण वाढवते.

- स्नायूंना बळकटी देते.

- एंडोक्राइन (हार्मोन) प्रणालीला उत्तेजित करते.

- हेल्दी इम्यून सिस्टीमला सपोर्ट करते.

पुरुष आणि स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता वाढवणारी योगासन

१) सूर्यनमस्कार

हे योग आसन मासिक पाळीच्या क्रॅम्प्सच्या व्यवस्थापनासाठी खूप प्रसिद्ध आहे. हे रजोनिवृत्ती दरम्यान देखील उपयुक्त आहे. त्याचा परिणाम स्त्रीच्या गर्भाशयावर होत असल्याने सूर्यनमस्कार योग बाळंतपण सुलभ होण्यास मदत करतो. हे शरीराचे लैंगिक कार्य देखील सुधारते. हे लैंगिक ग्रंथींच्या बिघडण्याशी संबंधित कोणतीही समस्या दूर करते.

२) पश्चिमोत्तनासन

हे आसन तुमच्या पाठीच्या खालच्या बाजूचे, नितंबांचे आणि हॅमस्ट्रिंगचे स्नायू ताणते. हे स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता सुधारते. कारण ते अंडाशय आणि पोट यासारख्या महत्त्वपूर्ण अवयवांना सक्रिय करते आणि मानसिक ताण कमी करते.

३) जानुशिरासन

हे योगासन केवळ गर्भधारणेसाठी आवश्यक नाही तर गर्भधारणे दरम्यान देखील फायदेशीर ठरू शकते. हे पोटाच्या स्नायूंना आराम देताना हॅमस्ट्रिंग्स ताणते.

४) बटरफ्लाय पोझ

तुमच्या आतील मांड्या, गुप्तांग, नितंब क्षेत्र आणि गुडघे यांच्या स्नायूंना ताणताना ते लवचिकता सुधारते. हा अधिक उपयुक्त प्रजनन योग व्यायामांपैकी एक आहे आणि वेळ आल्यावर सहज आणि कमी वेदनादायक प्रसूतीमध्ये देखील मदत करू शकतो.

५) बालासन

हे आसन ताणतणाव दूर करते आणि रक्त प्रवाह वाढवते. याशिवाय, हेआसन तुमच्या पाठीचे, गुडघे, नितंब आणि मांडीचे स्नायू स्ट्रेच करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या