मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: हिवाळ्यातील गुडघेदुखीला करा बाय बाय, मदत करतील हे ३ योगासन!

Yoga Mantra: हिवाळ्यातील गुडघेदुखीला करा बाय बाय, मदत करतील हे ३ योगासन!

Jan 05, 2023, 08:27 AM IST

    • Yoga asana for Knee Pain in Winter: जर तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर योग तुम्हाला मदत करू शकतो. योगा केल्याने पायाचे रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच गुडघेदुखीपासूनही आराम मिळतो. चला जाणून घेऊया.
गरुडासन

Yoga asana for Knee Pain in Winter: जर तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर योग तुम्हाला मदत करू शकतो. योगा केल्याने पायाचे रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच गुडघेदुखीपासूनही आराम मिळतो. चला जाणून घेऊया.

    • Yoga asana for Knee Pain in Winter: जर तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर योग तुम्हाला मदत करू शकतो. योगा केल्याने पायाचे रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच गुडघेदुखीपासूनही आराम मिळतो. चला जाणून घेऊया.

Yoga Poses to Get Rid of Knee Pain: पूर्वीच्या काळी गुडघेदुखीची समस्या वयाशी जोडलेली होती. पण आजकाल हिवाळा सुरू होताच तरुण किंवा वृद्ध गुडघेदुखीची तक्रार करू लागतात. यामागे शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे किंवा जास्त ऑइली खाणे अशी अनेक कारणे असू शकतात. जर तुम्ही देखील गुडघेदुखीने त्रस्त असाल तर योग तुम्हाला मदत करू शकतो. योगा केल्याने पायाचे ब्लड सर्कुलेशन सोबतच गुडघेदुखीपासूनही आराम मिळतो. चला जाणून घेऊया कोणत्या ३ योगासनांमुळे गुडघेदुखीपासून सुटका मिळू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

गरुडासन (Garudasana)

गरुडासनाला इंग्रजीत Eagle pose असेही म्हणतात. गुडघे मजबूत करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी जमिनीवर सरळ उभे राहा. यानंतर उजवा गुडघा वाकवून डाव्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. नंतर उजवा पाय डावीकडे वळवून मागे घ्या. या दरम्यान उजवी मांडी डावीकडे ठेवा. या आसनात दोन्ही हात पुढे करा. दोन्ही हातांच्या कोपरांना वाकवून क्रॉस करा. हातांना क्रॉस करताना उजवा हात डावीकडे ठेवा.

त्रिकोनासन (Trikonasana)

त्रिकोनासन केल्याने स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहावे. हे करत असताना गुडघे वाकवू नका, सरळ उभे रहा. पायांमध्ये सुमारे दोन फूट अंतर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि शरीर उजवीकडे वाकवा. वरीलप्रमाणे डावा हात कानाला लावा. डाव्या हाताच्या बोटांवर डोळे फिक्स करा. काही सेकंद असेच राहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सामान्य स्थितीत या. दुसऱ्या बाजूने ही प्रक्रिया पुन्हा करा.

मकरासन (Makarasana)

मकरासन केल्याने पायांच्या स्नायूंना खूप ताकद मिळते. त्यामुळे गुडघेदुखी मध्ये व्यक्तीला खूप आराम मिळतो. हे नेहमी रिकाम्या पोटी करा. लक्षात ठेवा की हे किमान पाच मिनिटे सुमारे १० वेळा करा आणि हे दिवसातून किमान २ वेळा करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या