मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  सगळ्यांनाच डायजेस्ट होत नाही ग्रीन टी, ही आहे पिण्याची योग्य वेळ

सगळ्यांनाच डायजेस्ट होत नाही ग्रीन टी, ही आहे पिण्याची योग्य वेळ

Oct 06, 2022, 01:25 PM IST

    • Green Tea : ग्रीन टी मुळे होणाऱ्या अनेक फायद्यांमुळे ते लोक नियमित पितात. पण ते सगळ्यांनाच पचेल असे नाही. जाणून घ्या ते पिण्याची योग्य वेळ आणि काय काळजी घ्यावी.
ग्रीन टी

Green Tea : ग्रीन टी मुळे होणाऱ्या अनेक फायद्यांमुळे ते लोक नियमित पितात. पण ते सगळ्यांनाच पचेल असे नाही. जाणून घ्या ते पिण्याची योग्य वेळ आणि काय काळजी घ्यावी.

    • Green Tea : ग्रीन टी मुळे होणाऱ्या अनेक फायद्यांमुळे ते लोक नियमित पितात. पण ते सगळ्यांनाच पचेल असे नाही. जाणून घ्या ते पिण्याची योग्य वेळ आणि काय काळजी घ्यावी.

Right Time of Drinking Green Tea : अनेकांच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीने होते. त्याच वेळी, बरेच लोक हे नॅचरल डिटॉक्सर म्हणून सकाळी रिकाम्या पोटी पितात. पण तुम्हाला माहित आहे का की रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे प्रत्येकाला डायजेस्ट होत नाही. अशा परिस्थितीत इतरांना पाहून ग्रीन टी पिण्यापूर्वी, त्याचे फायदे आणि पिण्याची योग्य वेळ जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

Multani Mitti for Skin: उन्हाळ्यात चेहऱ्यावर अशा प्रकारे लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल थंडावा

joke of the day : प्रेमात सपशेल अपयशी ठरलेला प्रियकर जेव्हा प्रेयसीच्या लग्नाला जातो…

Press Freedom Day 2024: का साजरा केला जातो प्रेस फ्रीडम डे, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

ग्रीन टीचे फायदे (Benefits of Green Tea)

स्किन इंफेक्शनपासून संरक्षण

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे स्किनचे डॅमेज सेल्स भरून काढतात. त्वचेची जळजळ कमी होते, घट्टपणा राखला जातो आणि पुरळ कमी होते.

वजन कमी करण्यात मदत

ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मेटाबॉलिज्म गतिमान करतात. चरबी झपाट्याने कमी होते. ग्रीन टी प्यायल्यानंतर व्यायाम केल्याने चरबीचे ऑक्सिडेशन वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढण्यास प्रतिबंध होतो. मात्र व्यायाम आणि आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

कॅन्सरपासून बचाव

यामध्ये असलेले पॉलीफेनॉल ट्यूमर आणि कर्करोगाच्या पेशींना रोखण्याचे काम करतात. हे ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर रोखण्यासाठी देखील मदत करते.

रक्तवाहिन्या ठेवते निरोगी

नियमित सेवनाने रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर ठेवण्यास मदत होते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

मानसिक आरोग्य

कॅफीन मेंदूसाठी प्रतिबंधक न्यूरोट्रांसमीटरच्या क्रियाकलापांना प्रतिबंधित करते. स्मरणशक्ती चांगली राहते. यामध्ये असलेले अमीनो अॅसिड मेंदूचे रासायनिक संदेशवाहक गाबाचे स्तर सुधारते, ज्यामुळे तणाव कमी होतो.

ग्रीन टी कधी प्यावी आणि काय खबरदारी घ्यावी

जेवणाच्या किमान एक तास आधी ग्रीन टी प्या. त्यात टॅनिन असते, जेवण्यापूर्वी लगेच प्यायल्याने पोटदुखी, मळमळ किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी पिणे टाळा. ग्रीन टी पिताना त्याच्यासोबत काहीतरी आवर्जून खा. दिवसातून तीन कपपेक्षा जास्त पिऊ नका, डिहायड्रेशन होऊ शकते. जास्त प्रमाणात कॅफिनमुळे निद्रानाश, पोट खराब होणे, उलट्या होणे, जुलाब आणि यूरिनच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी लगेच ग्रीन टी पिऊ नका.

दूध किंवा साखर वापरू नका

ग्रीन टीसाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ योग्य आहे. हे चयापचय सक्रिय करण्यास मदत करते. यात दूध किंवा साखर अजिबात वापरु नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग