मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  New Year Celebration: नवीन वर्ष साजरे करण्यासाठी या भारतीय पर्यटन स्थळांना भेट द्या!

New Year Celebration: नवीन वर्ष साजरे करण्यासाठी या भारतीय पर्यटन स्थळांना भेट द्या!

Dec 28, 2022, 09:33 AM IST

    • New Year Trip: नवीन वर्ष २०२३ काही दिवसात सुरु होणार आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर आम्ही काही भारतीय पर्यटन स्थळांबद्दल सांगत आहोत, जे आकर्षक आणि स्वस्त आहेत.
न्यू इयर ट्रिप (Freepik )

New Year Trip: नवीन वर्ष २०२३ काही दिवसात सुरु होणार आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर आम्ही काही भारतीय पर्यटन स्थळांबद्दल सांगत आहोत, जे आकर्षक आणि स्वस्त आहेत.

    • New Year Trip: नवीन वर्ष २०२३ काही दिवसात सुरु होणार आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर आम्ही काही भारतीय पर्यटन स्थळांबद्दल सांगत आहोत, जे आकर्षक आणि स्वस्त आहेत.

New Year 2023: नवीन वर्ष २०२३ अवघ्या काही दिवसांवर आलं आहे. दरवर्षीप्रमाणे लोक आपापल्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करतील. तसे, हा खास दिवस ट्रिपच्या माध्यमातून साजरा करण्यात एक वेगळीच मजा आहे. यासाठी तुम्हाला विदेशात जाण्याची गरज नाही. भारतातही अनेक सुंदर ठिकाणं आहेत जिथे तुम्ही नवीन वर्ष सेलिब्रेट करू शकता. येथे आम्ही अशाच काही भारतीय पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत, जे आकर्षक आणि स्वस्त आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Melon Cooler: उन्हाळ्यात थंड ठेवेल मेलन कूलर, नोट करा शेफ रणवीरची ही टेस्टी रेसिपी

Cancer Risk: डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे वाढत आहे प्रमाण, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Weight Loss Mistakes: रोजच्या या चुकांमुळे वाढू लागतं वजन, तुम्हीही करता का ही चूक?

Samosa Recipe: कमी तेलात झटपट बनवू शकता समोसे, बनवण्यासाठी ट्राय करा ही रेसिपी

अलवर

राजस्थानमधील अलवर हे राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे तुम्ही सरिस्का नॅशनल पार्कमधील मित्रांसोबत बॉर्न फायर पार्टी करू शकता. अल्वरमध्ये तुम्ही दाल-बाटी आणि चुरमा यांसारख्या प्रादेशिक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

ऋषिकेश

हे उत्तर भारतीयांचे नेहमीच आवडते पर्यटन स्थळ आहे. राहण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व काही इथे स्वस्त आहे. स्वस्तात राहायचे असेल तर इथे धर्मशाळा किंवा मठात राहू शकता. ऍडव्हेंचरसाठी येथे रिव्हर राफ्टिंग करता येते.

नैनिताल

तलावांचा बालेकिल्ला असलेले नैनिताल स्वस्त प्रवासासाठी ओळखले जाते. जर तुम्हाला इथे बजेट ट्रिप करायची असेल तर मॉल रोडपासून दूर हॉटेल बुक करा. तरीही जाण्यापूर्वी बुकिंग करा. नववर्षातील हवामानामुळे हे पर्यटनस्थळ आणखीनच सुंदर दिसत आहे.

जयपूर

राजस्थानची राजधानी जयपूरला भेट देणं ही वेगळीच गोष्ट आहे. संध्याकाळी इथे एक वेगळीच चमक असते. इथला मुक्काम आणि इथलं जेवण दोन्ही अप्रतिम आहे. तुम्ही मुलांना सोबत घेऊन जात असाल तर त्यांना इथे खूप मजा येईल.