मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Samosa Recipe: कमी तेलात झटपट बनवू शकता समोसे, बनवण्यासाठी ट्राय करा ही रेसिपी

Samosa Recipe: कमी तेलात झटपट बनवू शकता समोसे, बनवण्यासाठी ट्राय करा ही रेसिपी

May 02, 2024, 07:06 PM IST

    • Snacks Recipe: समोसे चवीला अप्रतिम असतात. संध्याकाळच्या चहासोबत गरम समोसे खायला सर्वांनाच आवडतात. एअर फ्रायरमध्ये झटपट समोसे कसे बनवायचे ते जाणून घ्या.
Samosa Recipe: कमी तेलात झटपट बनवू शकता समोसे, बनवण्यासाठी ट्राय करा ही रेसिपी (unsplash)

Snacks Recipe: समोसे चवीला अप्रतिम असतात. संध्याकाळच्या चहासोबत गरम समोसे खायला सर्वांनाच आवडतात. एअर फ्रायरमध्ये झटपट समोसे कसे बनवायचे ते जाणून घ्या.

    • Snacks Recipe: समोसे चवीला अप्रतिम असतात. संध्याकाळच्या चहासोबत गरम समोसे खायला सर्वांनाच आवडतात. एअर फ्रायरमध्ये झटपट समोसे कसे बनवायचे ते जाणून घ्या.

Air Fryer Samosa Recipe: संध्याकाळी चहासोबत काही खाण्यासाठी स्नॅक्सचा विचार केला की सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे समोसे. समोसे चवीला अप्रतिम असतात. पण ते तेलात तळलेले असतात. अशा परिस्थितीत ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही तेल आणि तुपाशिवाय घरी समोसे बनवू शकता. आम्ही तुम्हाला एअर फ्रायरमध्ये समोसे कसे बनवायचे ते सांगत आहोत. हे बनवणे सोपे असून समोसे झटपट तयार होतात. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या एअर फ्रायरमध्ये समोसे बनवण्याची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

एअर फ्रायरमध्ये समोसा बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- १ कप मैदा

- २ टेबलस्पून रवा

- १ इंच किसलेले आले

- ४ मिरच्या

- ४-५ उकळलेले बटाटे

- मूठभर कोथिंबीर

- २ चिमूट ओवा

- १ टीस्पून धणे

- १ टीस्पून बडीशेप

- १ टीस्पून जिरे

- १/२ टीस्पून काळी मिरी

- १/२ टीस्पून चाट मसाला

- १/२ टीस्पून गरम मसाला

- २ चिमूट आमचूर पावडर

- २ टीस्पून कसुरी मेथी

- ३ टेबलस्पून तूप किंवा तेल

- मीठ चवीनुसार

समोसे बनवण्याची पद्धत

समोसे बनवण्यासाठी तेल आणि मैदा तोपर्यंत एकत्र घासा जोपर्यंत त्याची रचना वाळू सारखी होत नाही. आता त्यात १/३ कप पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. पीठ ३० मिनिटे बाजूला ठेवा. आता तोपर्यंत बटाट्याचे स्टफिंग तयार करून घ्या. यासाठी बटाटे उकळून घ्या. आता तूप गरम करून त्यात धणे, बडीशेप, जिरे आणि मीठ घालून मंद आचेवर एक मिनिट परतून घ्या. नंतर त्यात १ इंच किसलेले आले आणि ४ मिरच्या घाला. नंतर त्यात उकडलेले बटाटे, काळी मिरी, चाट मसाला, गरम मसाला आणि आमचूर पावडर घाला. शेवटी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून बटाटे मॅश करा. 

आता पीठाचा गोळा घेऊन लाटून घ्या. त्यात बटाट्याचे स्टफिंग भरा. थोडे तूप लावून १५० अंशांवर २० मिनिटे एअर फ्राय करा. तुमचे टेस्टी समोसे तयार आहे.

पुढील बातम्या