Corn Chaat Recipe: जर तुम्हालाही संध्याकाळच्या चहासोबत काही चटपटीत खाण्याची क्रेविंग असेल तर तुम्ही घरी चाट तयार करू शकता. अनेक गोष्टींपासून चाट बनवता येते. येथे आम्ही तुम्हाला कॉर्न चाट कसा बनवायचा ते सांगत आहोत. कॉर्न चाट हा एक हेल्दी स्नॅक्स आहे. याची चव अप्रतिम आहे. लोक कॉर्न चाट वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. पण आम्ही तुम्हाला ती नवीन पद्धतीने कशी बनवायची ते सांगत आहोत. स्वीट कॉर्न चव आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जे संध्याकाळची भूक भागवण्यासाठी उत्तम आहे. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला सोपी आणि झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या चटपटीत कॉर्न चाट कसा बनवायचा.
- २ वाट्या स्वीट कॉर्नचे दाणे
- १ मध्यम आकाराचा टोमॅटो चिरलेला
- १ मध्यम आकाराची हिरवी शिमला मिरची चिरलेली
- १ मध्यम आकाराचा कांदा चिरलेला
- अर्धा चमचा तूप
- चवीनुसार मीठ
- १ टीस्पून ताजी काळी मिरी पावडर
- १ टेबलस्पून चाट मसाला
- लिंबाचा रस
- कोथिंबीर
चटपटीत कॉर्न चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम स्वीट कॉर्नचे दाणे मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर उकळा. नंतर कढईत तूप टाका. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता. हे गरम झाल्यावर त्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी शिमला मिरची घाला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात पिवळी आणि लाल शिमला मिरची सुद्धा टाकू शकता. यासोबत चाट मसाला, मीठ आणि काळी मिरी पावडर देखील घाला. आता झाकण ठेवून मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवा.
ते भाजल्यावर त्यात उकडलेले कॉर्न टाका आणि लिंबाचा रस घाला. हे सर्व चांगले मिक्स करा आणि थोडा वेळ शिजवा. तुमचे कॉर्न चाट तयार आहे. बारीक चिरलेल्या कोथिंबीरने सजवा आणि लगेच सर्व्ह करा.