मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Monkeypox : सेक्स केल्यामुळं पसरतोय मंकीपॉक्स; तज्ज्ञांनी दिला हा इशारा

Monkeypox : सेक्स केल्यामुळं पसरतोय मंकीपॉक्स; तज्ज्ञांनी दिला हा इशारा

May 20, 2022, 03:07 PM IST

    • Monkeypox : आफ्रिकेतून आता जगभर वेगानं पसरत असलेल्या मंकीपॉक्स या नव्या रोगांना थैमान घातलेलं असून युरोपमध्ये या रोगाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.
How Does Monkeypox Spread (HT)

Monkeypox : आफ्रिकेतून आता जगभर वेगानं पसरत असलेल्या मंकीपॉक्स या नव्या रोगांना थैमान घातलेलं असून युरोपमध्ये या रोगाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.

    • Monkeypox : आफ्रिकेतून आता जगभर वेगानं पसरत असलेल्या मंकीपॉक्स या नव्या रोगांना थैमान घातलेलं असून युरोपमध्ये या रोगाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.

अनेक देशांमध्ये कोरोना महामारीमुळं अनेक लोकांना जीव गमवावा लागलेला असताना आता आफ्रिकेत मंकीपॉक्स नावाच्या नव्या विषाणूनं थैमान घातलं आहे. आशिया आणि विशेषत: यूरोपीय देशांमध्ये या नव्या रोगाचे अनेक रुग्ण सापडत आहे. त्यामुळं अनेक लोकांना आणि तज्ज्ञांना या रोगाची चिंता सतावत आहे, त्यातच आता या रोगासंदर्भात काही डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Summer Drinks: उन्हाळ्यात उष्णता टाळण्यासाठी प्या हे समर ड्रिंक्स, टेस्टसोबत आरोग्याचीही घेतात काळजी

Hip Dysplasia: हिप डिसप्लेसिया म्हणजे काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार

Curry Masala Powder: आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरीच बनवा हा करी मसाला, जेवण चविष्ट बनवेल ही रेसिपी

Weight Loss Tips: वजन कमी करायचं आहे? आहारात अशा प्रकारे करा लिंबाचा समावेश, होईल फायदा

मंकीपॉक्स या रोगाचा संसर्ग कसा होतो, याचा खुलासा अजून झालेला नाही. मात्र या रोगाच्या प्रसारासाठी शारीरिक संबंध हे एक मोठं कारण मानलं जात आहे. त्यामुळं मंकीपॉक्सग्रस्त रुग्णाशी लैंगिक संबंध ठेवल्यास त्यामुळं तुम्हाला या रोगाची लागण होऊ शकते, असं काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. हा संसर्गजन्य रोग सर्वात आधी आफ्रिकेतील काही माकडांमध्ये आढळला होता. त्यानंतर त्याची साथ मानवामध्ये पसरली आहे. त्यामुळं आता कोरोनानंतर या भयानक रोगाचा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं चित्र आहे.

काय आहेत मंकीपॉक्स रोगाची लक्षणं?

१. स्नायूंमध्ये वेदना आणि थंडी वाजून येणं

२. सातत्यानं थकवा जाववणं

३. तीव्र ताप आणि न्यूमोनिया होणं

४. शरीरावर गडद लाल ठिपके येणं

५. डोकेदुखीचा त्रास होणं

मिळालेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स हा कांजिण्याप्रमाणे एक पॉक्स असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु अजूनही या संसर्गजन्य रोगाच्या प्रसाराचं कारण, त्याचा उपाय आणि उपचार सापडलेले नाहीत.

गेल्या काही दिवसांमध्ये इंग्लंड आणि अमेरिकेत या घातक आजाराचे हजारोंच्या संख्येनं रुग्ण सापडल्यानं या देशांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळं विविध देशांनी या गंभीर संसर्गजन्य आजाराबाबत खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)