मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rawa Kachori Recipe: नाश्त्यात बनवा रवा कचोरी! बघा रेसिपीचा Video

Rawa Kachori Recipe: नाश्त्यात बनवा रवा कचोरी! बघा रेसिपीचा Video

May 16, 2023, 11:32 AM IST

    • Breakfast Recipe: रवा कचोरीची रेसिपी खूप सोपी आहे. ही डिश तुम्ही सकाळ किंवा संध्यकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.
snacks recipes (home_food_space_ / Instagram )

Breakfast Recipe: रवा कचोरीची रेसिपी खूप सोपी आहे. ही डिश तुम्ही सकाळ किंवा संध्यकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.

    • Breakfast Recipe: रवा कचोरीची रेसिपी खूप सोपी आहे. ही डिश तुम्ही सकाळ किंवा संध्यकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.

Tea Time snacks recipe: तुम्ही रव्यापासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला असेल, पण तुम्ही कधी रवा कचोरी रेसिपी करून पाहिली आहे का? जर नसेल तर यावेळी तुम्ही नाश्त्यात रवा कचोरीची रेसिपी करून सगळ्यांकडून प्रशंसा मिळवून घेऊ शकता. रवा कचोरी बनवण्याची रेसिपी जी इंस्टाग्राम यूजरने @home_food_space_ ने त्याच्या अकाउंटवर शेअर केली आहे. चला तर मग जाणून घेऊया रवा कचोरीची रेसिपी...

ट्रेंडिंग न्यूज

Health Care Tips: पूर्ण दिवस एसीमध्ये राहता का? सावधान! यामुळे होऊ शकतात हे मोठे आजार

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

Multani Mitti for Skin: उन्हाळ्यात चेहऱ्यावर अशा प्रकारे लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल थंडावा

joke of the day : प्रेमात सपशेल अपयशी ठरलेला प्रियकर जेव्हा प्रेयसीच्या लग्नाला जातो…

लागणारे साहित्य

एक वाटी रवा, एक ग्लास पाणी, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, दोन उकडलेले बटाटे, एक शिमला मिरची, एक गाजर, कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, आवश्यक तेल आणि मीठ चवीनुसार घ्या.

Mango Peda Recipe: उन्हाळ्यात बनवा आंब्याचे पेढे! नोट करा सोपी रेसिपी

रवा कचोरी बनवण्याची पद्धत

रवा कचोरी बनवण्यासाठी प्रथम सर्व भाज्या नीट धुवून बारीक चिरून घ्या. आता एका कढईत पाणी गरम करून त्यात चिली फ्लेक्स टाका, नंतर दोन चमचे तेल घाला. यानंतर पाण्यात मीठ आणि रवा टाका. नंतर सर्व पाणी सुटेपर्यंत रवा ढवळत राहा. आता हे रव्याचे पीठ करून बाजूला ठेवा.

Cheese Tomato Sandwich Recipe: नाश्त्यात बनवा चविष्ट चीज टोमॅटो सँडविच! जाणून घ्या रेसिपी

यानंतर उकडलेले बटाटे मॅश करून त्यात चिरलेली सिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड घालून चांगले मिक्स करून सारण तयार करा. नंतर रव्याच्या पिठाचा मोठा गोळा घेऊन त्यात एक चमचा सारण भरून कचोरीचा आकार द्या. आता कढईत तेल गरम करून त्यात कचोऱ्या तळून घ्या. तुमची गरमागरम रवा कचोरी तयार आहे. तुम्ही त्यांना चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.