मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kothimbir Vadi Recipe: अशी बनवा चविष्ट कोथिंबीर वडी! बघा रेसिपीचा Video

Kothimbir Vadi Recipe: अशी बनवा चविष्ट कोथिंबीर वडी! बघा रेसिपीचा Video

May 30, 2023, 03:31 PM IST

    • स्नॅक्समध्ये खाण्यासाठी तुम्ही कोथिंबीर वडीची खास रेसिपी ट्राय करून पाहू शकता.
Tea Time Snacks Recipe (Freepik)

स्नॅक्समध्ये खाण्यासाठी तुम्ही कोथिंबीर वडीची खास रेसिपी ट्राय करून पाहू शकता.

    • स्नॅक्समध्ये खाण्यासाठी तुम्ही कोथिंबीर वडीची खास रेसिपी ट्राय करून पाहू शकता.

बर्‍याच वेळा रेगुलरपेक्षा काही तरी वेगळं खावंसं वाटते. ज्याची चव हटके असेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कोथिंबीर वडीची अतिशय खास पण अतिशय सोपी रेसिपी करून पाहू शकता. कोथिंबीर वडीची ही रेसिपी इन्स्टाग्राम यूजर @rasoi_ghar_ने त्याच्या अकाउंटवर व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. अशा खास आणि सोप्या रेसिपीज त्यांच्या अकाउंटवर अनेकदा शेअर केल्या जातात. चला जाणून घेऊया कोथिंबीर वडी बनवण्याची पद्धत.

ट्रेंडिंग न्यूज

Heat Rash In Babies: वाढत्या गरमीमुळे लहान बाळांना घामोळ्या येतायत? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

Weight Loss: वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, डाएटमध्ये आवर्जून सामील करा पपईच्या बिया! फायदे वाचाच...

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

joke of the day : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

लागणारे साहित्य

एक वाटी बेसन, पाव वाटी रवा, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धने पावडर, दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून आले पेस्ट, चतुर्थांश वाटी दही, दोन वाट्या पाणी, चतुर्थांश टीस्पून जिरे, चतुर्थांश टीस्पून, तीळ, चिमूटभर हिंग, चतुर्थांश टीस्पून मोहरी, दोन चमचे भाजलेले व ठेचलेले शेंगदाणे, दोन वाट्या हिरवी कोथिंबीर, तळण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ.

जाणून घ्या रेसिपी

कोथिंबीर वडी बनवण्यासाठी प्रथम बेसन, रवा एकत्र मिक्स करा. नंतर त्यात हळद, लाल तिखट, धने पावडर, चिरलेली हिरवी मिरची, आले पेस्ट आणि दही मिक्स करा. आता त्यात पाणी मिसळून स्लरी बनवा. आता कढईत दोन चमचे तेल टाका आणि गरम होऊ द्या. नंतर त्यात जिरे, तीळ, हिंग, मोहरी आणि शेंगदाणे टाकून एक मिनिट परतून घ्या. नंतर त्यात सर्व कोथिंबीर टाकून पुन्हा दोन मिनिटे परतून घ्या.

आता त्यात बेसन आणि रव्याचे मिश्रण घालून मध्यम आचेवर घट्ट पीठ होईपर्यंत शिजवा. नंतर हे पीठ एका प्लेटमध्ये काढून चमच्याच्या मदतीने चौकोनी आकार द्या आणि थंड होऊ द्या. आता त्याचे बर्फीसारखे तुकडे करून बाजूला ठेवा. नंतर कढईत तळण्यासाठी तेल घेऊन गरम होऊ द्या. यानंतर हे सर्व तुकडे तळून घ्यावेत. तुमची गरम गरम कोथिंबीर वडी तयार आहे.

विभाग